महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Death Rate Decreased पावसाळ्यात दुर्घटनांमधील मृत्यूचे प्रमाण घटले - मृत्यूची संख्या घटली

Death Rate Decreased मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात Death Rate Decreased जून ते सप्टेंबर या चार महिन्यात समुद्रात बुडणे, मॅनहोलमध्ये पडून मृत्यू होणे, दरड कोसळणे, इमारती घरे झाडे विजा कोसळून मृत्यू होणे, अशा घटना नोंद होतात. २०२१ मध्ये दरडी कोसळणे, झाडे आणि फांद्या कोसळणे, शॉक लागणे. यामुळे ३४ जणांचा मृत्यू झाला होता. २०२२ मध्ये त्यात घट होऊन केवळ ३ जणांचा मृत्यू झाला आहे.

Death Rate Decreased
Death Rate Decreased

By

Published : Sep 15, 2022, 10:12 PM IST

मुंबईमुंबईत दरवर्षी पावसाळ्यात Death Rate Decreased जून ते सप्टेंबर या चार महिन्यात समुद्रात बुडणे, मॅनहोलमध्ये पडून मृत्यू होणे, दरड कोसळणे, इमारती घरे झाडे विजा कोसळून मृत्यू होणे, अशा घटना नोंद होतात. २०२१ मध्ये दरडी कोसळणे, झाडे आणि फांद्या कोसळणे, शॉक लागणे. यामुळे ३४ जणांचा मृत्यू झाला होता. २०२२ मध्ये त्यात घट होऊन केवळ ३ जणांचा मृत्यू झाला आहे. during monsoon In Mumbai मागील वर्षापेक्षा यंदा तक्रारी वाढल्या असल्या, Accidental death तरी मृत्यूची संख्या घटली आहे.

२०२१ मध्ये ३४ जणांचा मृत्यूमुंबईमध्ये १ जून ते ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीत दरडी कोसळणे, झाडे आणि फांद्या कोसळणे, शॉक लागणे याबाबत ९६५ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यात २४ जण जखमी झाले होते. तर ३४ जणांचा मृत्यू झाला होता. या कालावधीत दरडी कोसळण्याच्या १८ घटना नोंद झाल्या. त्यात ११ जण जखमी झाले तर २९ जणांचा मृत्यू झाला होता. झाडे आणि फांदया पडण्याच्या ९२१ घटना नोंद झाल्या, त्यात ११ जण जखमी झाले होते. शॉक लागण्याच्या २६ घटना नोंद झाल्या त्यात २ जण जखमी झाले तर ५ जणांचा मृत्यू झाला होता.

२०२२ मध्ये ३ जणांचा मृत्यू यंदा १ जून ते १५ सप्टेंबर २०२२ या कालावधीत दरडी कोसळणे, झाडे आणि फांद्या कोसळणे, शॉक लागणे याबाबत १३६४ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यात ३३ जण जखमी झाले होते. तर केवळ ३ जणांचा मृत्यू झाला आहे. या कालावधीत दरडी कोसळण्याच्या २४ घटना नोंद झाल्या. त्यात ६ जण जखमी झाले. झाडे आणि फांदया पडण्याच्या १३१० घटना नोंद झाल्या, त्यात २७ जण जखमी झाले होते. शॉक लागण्याच्या ३० घटना नोंद झाल्या त्यात ३ जणांचा मृत्यू झाला आहे.

दरडी कोसळणाऱ्या ठिकाणच्या नागरिकांना प्रशिक्षण मुंबईमध्ये मागील वर्षी चेंबूर आणि विक्रोळी येथे दरडी कोसळून ३० हुन अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. मुंबईत दरडी कोसळू शकतात अशा ७२ ठिकाणांचा समावेश आहे. याठिकाणी दरड कोसळण्याचा धोका आहे. या ठिकाणांना रेड झोनमध्ये टाकण्यात आले आहे. अशा ठिकाणी दुर्घटना घडल्यावर त्याठिकाणी बचाव पथक पोहचण्यास काही कालावधी लागतो. दुर्घटना घडल्यापासून बचाव पथक पोहोचण्याच्या काळात नागरिकांची पळापळ असते. अशावेळी नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणे, त्यांना प्रथोमोपचार देणे याचे १० हजार नागरिकांना प्रशिक्षण दिले अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे प्रमुख महेश नार्वेकर यांनी दिली आहे.

सहाय्यक आयुक्तांवर कारवाई पावसाळ्यात इमारती कोसळून दुर्घटना ( Building Collapse In Rain ) घडतात. जीर्ण व जर्जर झालेल्या इमारतीला नोटीस न दिल्यास थेट सहाय्यक आयुक्तांवर कारवाईचा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( DCM Devendra Fadnavis ) यांनी दिला आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये अशा धोकादायक इमारतींमधील रहिवाश्यांना समजतील, अशा भाषेत नोटीस पाठवून त्या खाली केल्या पाहिजेत. जे वॉर्ड ऑफीसर ही कार्यवाही करणार नाहीत. त्या संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. तसेच, तात्पुरत्या निवाऱ्याची काही सोय करता येते का हे पाहिले पाहिजे. कारण लोक घरे सोडत नाहीत. केवळ पावसाळ्या दरम्यान त्यांनी काही काळासाठी या घरात घरात राहावेत, असा प्रयत्न करणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे.

६ वर्षात ११६६ जणांचा मृत्यू आग व इमारतींचे भाग, घरे, भिंती कोसळणे, समुद्रात, नाल्यात, नदीत, विहिरीत, खाडीत, खदानात, मॅनहोलमध्ये पडणे अशा २०१३ पासून २०१८ या ५ वर्षांच्या कालावधी ४९ हजार १७९ दुर्घटनांची नोंद पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडे झाली आहे. त्यात ९८७ जणांचा मृत्यू झाला आहे. ३०६६ जण जखमी झाले आहेत. १ जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०१९ पर्यंत एकूण १३१५० दुर्घटना घडल्या आहेत. यात १७९ जणांचा मृत्यू झाला असून त्यात १३२ पुरुष आणि ४७ स्त्रियांचा समावेश आहे. तर ७२२ जण जखमी झाले होते. २०१३ ते २०१९ या ६ वर्षाच्या कालावधीत विविध दुर्घटनांमध्ये ११६६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details