2.07 PM -कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील आंबा घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्प
12.58 PM -आरे येथील मेट्रोच्या कराशेडला जोरदार विरोध. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात आंदोलनाला सुरुवात.
11.10 AM -ठाण्यातील लूईसवाडी भागात कुकरचा स्फोट एक महिला जखमी
10.54 AM -मनसेने हिंदीतील मेट्रोची कोनशिला मराठीत करण्याची केली मागणी , हिंदीत कोनशिलेप्रकरणी राज्य शासनाचा केला निषेध
9.37 AM -अहेरी तालुक्यातील देवलमरी येथे पुराच्या पाण्यात विद्युत शॉक लागून २५ जनावारांचा मृत्यू
9:43 AM -हिंगोली - जिल्ह्यातील कनेरगाव नाका येथे पैनगंगा नदीवर मित्रांसमवेत पोहण्यासाठी गेलेला शंकर जयाजी भोयर (२६) हा तरुण बुडाला. नेहमीप्रमाणे पहाटे चार ते पाच मित्र पोहण्यास गेले होते. शोध मोहीम सुरू.
9:37 AM -गडचिरोली - अहेरी तालुक्यातील देवलमरी येथे पुराच्या पाण्यात विद्युत शॉक लागून २५ जनावारांचा मृत्यू
9:12 AM - कोल्हापूर - कोणत्याही क्षणी पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडणार. पंचगंगा नदी पाणी पातळी 38.7 फुटांवर. कोल्हापूरसह धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम. NDRF ची 3 पथके जिल्ह्यातील विविध भागांत दाखल.
9.00 AM -नवी दिल्ली - ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांचे दिल्लीतील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते.
8.46 AM - नागपूर- आईसह चार वर्षीय मुलाची बत्याने ठेचून हत्या. नागपूर जिल्ह्यातील नरखेडमध्ये आईसह चार वर्षीय मुलाची बत्याने ठेचून हत्येची घटना घडली आहे. प्रियांका साहू आणि अंशुल साहू असे मृतकांची नावे आहेत.
7:00 AM -डोंबिवलीतील रस्ते खराब असल्याची खंत पंडित हृदयनाथ मंगेशकर व्यक्त केली. खड्ड्यांमुळे कार्यक्रमाला उशीर झाला. ६० वर्षांपूर्वी जी डोंबिवलीतील रस्त्यांची परिस्थिती होती त्यापेक्षा आज दयनीय अवस्था आहे, असे ते म्हणाले. मंगेशकर यांनी डोंबिवलीतील रस्ते खड्डेमय रस्ते दुरुस्त करण्याची विनंती केली. डाॅ. रघुवीर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या शिवकल्याण राजा कार्यक्रमाला ते उपस्थित होते.