महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Aaditya Thackeray गद्दारांसोबत गेलेल्या निष्ठावंतांचाही गेम झाला, आदित्य ठाकरेंची शिंदे गटावर टीका - आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर टीका

आजपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या Monsoon session पहिल्याच दिवशी आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर Aaditya Thackeray criticized Shinde group जोरदार हल्लाबोल केला. पहिल्या दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या निष्ठावंतांचाही शिंदे यांनी गेम केला. त्यांच्या मनात इथेही निष्ठेला स्थान नाही, हे दाखवून दिले, अशी टीकेची झोड आदित्य ठाकरेंनी उठवली.

Aaditya Thackeray
Aaditya Thackeray

By

Published : Aug 17, 2022, 5:09 PM IST

Updated : Aug 17, 2022, 6:46 PM IST

मुंबईराज्यात बंडखोरांचे शिंदे सरकार सत्तेवर आल्यापासून शिवसेनेचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे चौफेर टीका करत आहेत. आजपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या Monsoon session पहिल्याच दिवशी आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर Aaditya Thackeray criticized Shinde group जोरदार हल्लाबोल केला. पहिल्या दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या निष्ठावंतांचाही शिंदे यांनी गेम केला. त्यांच्या मनात इथेही निष्ठेला स्थान नाही, हे दाखवून दिले, अशी टीकेची झोड आदित्य ठाकरेंनी उठवली. विधीमंडळात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. हे सरकार बेईमानीचे सरकार आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न मोठा आहे. जनतेचा आवाज सरकारला ऐकू येत नाही. केवळ सत्तेसाठी राजकारण करत आहेत. त्यामुळे घटनेच्या विरोधात काम सुरू आहे. मात्र, आम्ही न्याय देवतेकडे न्याय मागितल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.



'त्यांचा गेम झाला' :एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरुवातीला गेलेल्या गद्दारांचा ही गेम कसा केला हे सर्वांनाच दिसत आहे. मंत्रीमंडळ विस्तारात खरा मुख्यमंत्री कोण हे देखील सर्वांना कळाले आहे. अपक्षांना, महिलांना काही स्थान दिलेले नाही. मुंबईकरांनाही काही स्थान नाही. सर्वात प्रथम जाणारे १४-१५ जण जे निष्ठावंत होते, त्यांनाही स्थान दिलेले नाही. निष्ठेला मनात स्थान नाही हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. ज्या निष्ठावंतांना स्थान दिले आहे. त्यांनाही कमी लेखले आहे. आमच्याकडे बरे होते असे त्यांचे झाले आहे. तिथे जाऊन ते अडकले आहेत, नजरकैदेत आहेत. आता आमच्यासाठी दरवाजे खुले आहेत का असे त्यांना वाटत असेल. त्यांना मी सांगू इच्छितो, दरवाजे अद्यापही खुले आहेत. पण ज्यांना तिथे राहायचे असेल त्यांनी आमदाराकीचा राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरे जावे, असे आव्हान आदित्य ठाकरे दिले आहे.


'त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला' :बिहारमध्ये जे नितीश कुमार यांना जमले, ते उद्धव ठाकरेंना का जमले नाही असा सवाल विचारला असता, २०१९ मध्ये आम्ही देशाला पर्याय दिला होता. दुर्दैवाने आमच्यातूनच काही विश्वासघात करणारे गद्दार बाहेर पडले. ज्यांनी एका प्रामाणिक व्यक्तीच्या पाठीत खंजीर खुपसला. सगळे काही देणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणे ही महाराष्ट्राची, देशाची संस्कृती नाही. हे घाणेरडे राजकारण असून आम्ही ते दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच वरळी सगळ्यांना आवडतेय. तेथे दहीहंडी साजरी करायची असल्यास करावी. कोरोनानंतर हा सण साजरा करता येतोय. यात कुठेही राजकारण नसणार. वरळीत करा, वांद्र्यात करा, सगळ्यांनी सण साजरा करावा, ही आमची भावना आहे, असेही माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यावेळी म्हणालेत.

हेही वाचा -Aaditya Thackeray कपटी कारस्थानामुळेच सरकार कोसळले, आदित्य ठाकरेंची शिंदे सरकारवर टीका

Last Updated : Aug 17, 2022, 6:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details