महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई पाऊस अपडेट : आदित्य ठाकरे, महापौर, आयुक्तांनी परिस्थितीचा घेतला आढावा - मुंबई रेन न्यूज

मुंबईत गेल्या 24 तासांत कुलाबा येथे 252.2 तर, सांताक्रूझ येथे 268.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले.

mumbai rain
मुंबईत आज मुसळधार पाऊस

By

Published : Aug 4, 2020, 3:13 PM IST

मुंबई- शहरात सोमवारी सायंकाळपासून सतत पाऊस पडत आहे. सोमवारी रात्रीपासून पावसाने जोर धरल्याने मुंबईची तुंबई झाली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. त्यानंतर मुंबई शहर विभागाचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मुंबईत अनेक ठिकाणी भेट देत आढावा घेतला. यावेळी कोरोनासह पावसाचे संकट मुंबईवर आले आहे. महापौर, पालिकेचे आयुक्त, अधिकारी रस्त्यावर उतरून काम करत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

मुंबईतील पावसाच्या परिस्थितीचा आदित्य ठाकरे, महापौर, आयुक्तांनी घेतला आढावा

मुंबईत गेल्या 24 तासांत कुलाबा येथे 252.2 तर, सांताक्रूझ येथे 268.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले. या पाण्याचा निचरा होण्यासाठी पालिकेसह विविध यंत्रणांनी 700 पंप बसवले आहेत. तसेच पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिकेने पंपिंग स्टेशन कार्यान्वयीत केली आहेत.

शहरात पाणी साचल्याने या पाण्याचा निचरा करण्याच्या कामाची पाहणी महापौर किशोरी पेडणेकर आणि पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी करत आढावा घेतला. बीकेसी येथील मिनी पंपिंग स्टेशनला महापौर किशोरी पेडणेकर यांनी भेट देऊन पाणी उपसा करणाऱ्या पंपाची पाहणी केली. कलानगर तसेच इंदिरानगर या परिसरात भरणाऱ्या पाण्याचा उपसा या पंम्पिंग स्टेशनद्वारे केला जातो. गतवर्षी या परिसरात भरलेल्या पाण्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेने या मिनी पंपिंग स्टेशनची उभारणी केली आहे.

परेल हिंदमाता येथेही महापौरांनी भेट देऊन पाणी निचरा करण्याच्या कामाची पाहणी केली. महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आज मिठी नदीलगत असणाऱ्या कुर्ला परिसरातील क्रांतीनगर भागाची पाहणी करून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. आयुक्तांनी अंधेरी सबवे, मिलन सबवे या ठिकाणीही भेट दिली. वांद्रे पूर्व येथील ओएनजीसी आउटफॉलचीही आयुक्तांनी पाहणी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details