महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

वरळीत ६० मजली इमारतीला भीषण आग, बाराव्या मजल्याहून अशी खाली पडली व्यक्ती, बघा VIDEO

मुंबईतील वरळी परिसरातील एका टॉलरला भीषण आग लागण्याची घटना घडली आहे. करी रोड येथील अविघ्यान पार्क इमारतीच्या 19 व्या माळ्यावर ही आग लागल्याची माहिती आहे. घटनास्थळी अग्निशमन दल पोहोचत आहे.

एका इमारतीला भीषण आग
एका इमारतीला भीषण आग

By

Published : Oct 22, 2021, 12:33 PM IST

Updated : Oct 22, 2021, 2:03 PM IST

मुंबई- मुंबईतील लालबाग वरळी परिसरातील एका टॉवरला भीषण आग लागण्याची घटना घडली आहे. करी रोड येथील अविघ्यान पार्क इमारतीच्या 19 व्या माळ्यावर ही आग लागल्याची माहिती आहे. घटनास्थळी अग्निशमन दल पोहोचत आहे. दरम्यान, या दुर्घटनेत कुणीही जखमी किंवा मृत्युमुखी पडले नाही असे अग्निशमन दलाने सांगितले आहे. पण या इमारतीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात ब्लॅक पॅंट आणि पांढरा शर्ट घातलेली व्यक्ती इमारतीला लोंबकाळत आहे. आणि जरा वेळात ती खाली पडते. या व्यक्तिचे नाव अरुण तिवारी (वय ३०) असल्याची माहिती मिळाली आहे. जमिनीवर पडल्याने ती गंभीर जखमी झाली होती. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या व्यक्तिचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

या घटनेसंदर्भात बोलाताना मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी सांगितले, की या घटनेची उच्च स्तरीय चौकशी केली जाईल. दोषी लोकांना कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांनी कुणालाही पाठिशी घालू नका असे सांगितले आहे. त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.

ही ६० मजली इमारत असून १९ व्या मजल्यावर आग लागल्याचे अग्निशमन विभागाने सांगितले आहे.

बाराव्या माळ्याहून एक व्यक्ती खाली पडला

सकाळी सुमारे ११.५० च्या सुमारास या इमारतीला आग लागली. ही आग लेव्हल ३ ची असल्याचे अग्निशमन विभागाने सांगितले. उंचावर आग लागल्याने या भागात हवेची तीव्रता जास्त आहे. त्यामुळे ही आग भडकत असल्याचे अग्निशमन विभागाने सांगितले होते. आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत.

वरळी परिसरातील एका इमारतीला भीषण आग

मुंबईतील प्रसिद्ध करी रोड लोकल स्टेशनजवळ ही इमारत आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शक्यतो प्रयत्न करण्यात येत आहेत. येथील एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले, की आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर लगेच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आधी १९ व्या मजल्याला आग लागली होती. आता ती इतर मजल्यांवर पसरत असल्याचे दिसून येत आहे. आगीची तिव्रता बघून अग्निशमन दलाचे अतिरिक्त बंब घटनास्थळी हलविण्यात येत आहेत.

Last Updated : Oct 22, 2021, 2:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details