मुंबई - वांद्रे कुर्ला येथे बांधण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचा एक भाग कोसळला आहे. यामध्ये 14 कामगार जखमी झाले आहेत. यातील जखमी सर्वांना बीएन देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून आणि बचावकार्य सुरू आहे.
वांद्रे कुर्लामधे बांधण्यात येत असलेला उड्डाणपुल कोसळला, 14 कामगार जखमी - A flyover under construction
वांद्रे कुर्ला येथे बांधण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचा एक भाग कोसळला आहे. यामध्ये 14 कामगार जखमी झाले आहेत. यातील जखमी सर्वांना बीएन देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून आणि बचावकार्य सुरू आहे.
वांद्रे कुर्लामधे बांधण्यात येत असलेला उड्डाणपुल कोसळला, 14 कामगार जखमी
कामगाराचा मृत्यू झाला नाही
हा उड्डाणपूल मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलात बांधला जात होता. त्याचा एक भाग शुक्रवारी सकाळी 4:40 च्या सुमारास पडला. या अपघातात 14 मजूर जखमी झाले आहेत. डीसीपी मंजुनाथ सिंगे यांनी सांगितले की, अपघातात कोणीही बेपत्ता नाही. तसेच, कोणत्याही कामगाराचा मृत्यू झाला नाही. हा अपघात कशामुळे झाला याचा तपास केला जात आहे असही ते म्हणाले आहेत.