मुंबई - मुंबईतील प्रभादेवी परिसरात भीषण आग लागली ( fire breaks out in the Prabhadevi ) आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ( fire brigade ) 7 ते 8 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आग लागल्यानंतर शटरमधून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट येत होते.त्यामुळे बेस्ट सब स्टेशनचं शटर तोडून आतील आग विझवण्यात आली. वेळेत आग विझवल्यामुळे मोठी हानी टळली आहे. या घटनेही कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
Mumbai News : मुंबईतील प्रभादेवी परिसरातील बेस्ट सब स्टेशनला भीषण आग, सुदैवाने कोणीही जखमी नाही - अग्निशमन दल
मुंबईतील प्रभादेवी परिसरात आग ( Fierce fire in Prabhadevi area ) लागल्याचे वृत्त समोर आले आहे. प्रभादेवी परिसरातील बेस्ट सब स्टेशनला ही आग ( fire breaks out in the Prabhadevi ) लागली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन ( fire brigade ) दलाच्या 7 ते 8 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आग लागल्यानंतर शटरमधून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट येत होते.
२० मिनिटात आगीवर नियंत्रण -प्रभादेवी कामगार नगर येथील सामना प्रेसच्या समोर नागाटे बिल्डिंग आहे. या इमारतीमध्ये शहर विभागाला विद्यूत पुरवठा करणाऱ्या बेस्टचे सब स्टेशन आहे. या सब स्टेशनला आज दुपारी २.५४ च्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या ४ फायर इंजिन आणि ३ वॉटर टँकर घटनास्थळी पोहचले. त्याठिकाणी सब स्टेशनमधील ऑइल ट्रान्सफॉर्मरला आग लागल्याचे समोर आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी ३.१३ वाजता म्हणजेच अवघ्या २० मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवले. ही आग लेव्हल १ ची म्हणजेच छोटी आग होती. या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.