महाराष्ट्र

maharashtra

Night Schools In Mumbai रात्रशाळांबाबत दोन महिन्यांत सर्वसमावेशक धोरण; शिक्षण मंत्र्यांची विधान परिषदेत माहिती

By

Published : Aug 25, 2022, 8:30 PM IST

राज्यातील रात्रशाळांचे घोंगडे भिजत पडले आहे. विधान परिषदेत याचे आज तीव्र पडसाद उमटले आहेत. Night Schools In Mumbai लवकरच सर्वसमावेशक धोरण दोन महिन्यामध्ये तयार करु, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली.

शिक्षणमंत्री दीपक केसरकर
शिक्षणमंत्री दीपक केसरकर

मुंबई -मुंबईत एकेकाळी रात्रशाळेला खूप महत्व होते. या शाळेतील अनेकजण मोठ्या हुद्यावर पोहचले आहेत. सध्या मुंबईतील रात्रंशाळांमध्ये चांगल्या सोयी सुविधांची वानवा आहे. विधान परिषदेत प्रश्नोत्तर तासाच्या वेळेत रात्र शाळांचा मुद्दा आमदार नागोराव गाणार यांनी उपस्थित केला. comprehensive policy on night schools भाजपचे आमदार प्रवीण दरेकर, शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी मुंबई तर सर्वपक्षीय सदस्यांनी विविध भागांतील रात्रशाळेतील समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या. तसेच, रात्र शाळांचा दर्जा सुधाण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी केली. शालेय शिक्षणमंत्री केसरकर यांनी सरकारची भूमिका मांडली आहे.

विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवणारशिक्षकाच्या प्रश्नांबाबत एक सर्वसमावेशक असे धोरण ठरवून, शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी अभ्यासक्रमात बदल करण्याच्या दृष्टीने विचार विनिमय केले जाईल. टप्प्याटप्प्याने शाळांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सर्वसमावेशक धोरणात विद्यार्थी हा केंद्रस्थानी ठेवून त्याप्रमाणे धोरण आखले जाईल, असे स्पष्टीकरण केसरकर यांनी दिले.

हेही वाचा -Shinde vs Thackeray होय मी विकासाचे कंत्राट घेतलंय, मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर जोरदार पलटवार

ABOUT THE AUTHOR

...view details