मुंबई -शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांच्या अडचणी कमी होण्याचे चिन्ह दिसत नाही. स्वप्ना पाटकर प्रकरणात वाकोला पोलीस ठाण्यात संजय राऊत ( Ed arrest sanjay raut over patra chawl scam ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात शनिवारी ( police case on sanjay raut in Swapna Patkar case ) तक्रार दाखल करण्यात आली होती. आज पोलिसांनी आयपीसी कलम अन्वये गुन्हा ( ED Raid Sanjay Raut Residence ) दाखल केला आहे.
हेही वाचा -Sanjay Raut: शिवसेना खासदार विनायक राऊतांनी घेतली संजय राऊतांची भेट; पाहा, काय दिली प्रतिक्रिया
भारतीय दंड विधान कलम 504, 506 आणि 509 कलमांतर्गत गुन्हा दाखल ( Swapna Patkar case ) करण्यात आला आहे. पत्राचाळ घोटाळ्यात साक्षीदार असलेल्या स्वप्ना पाटकर यांनी संजय राऊत यांची एक ऑडिओ क्लिप प्रसिद्ध केली होती आणि त्यानंतर वाकोला पोलीस ठाण्यात एनसी अज्ञात व्यक्ती विरोधात दाखल करण्यात आली होती. वाकोला पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रदीप मोरे यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे कलम 504, 506, 509 अंतर्गत वाकोला पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
संजय राऊत यांच्या घरून 11 लाख 25 हजार रुपये जप्त - संजय राऊत यांची गोरेगाव येथील पत्राचाळ भूखंड घोटाळा प्रकरणात ईडीकडून नऊ तास चौकशी केल्यानंतर त्यांना त्यांच्या घरून दुपारी 5 वाजता ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर मुंबईतील ईडी कार्यालयात त्यांची चौकशी सुरू होती. संजय राऊत यांच्याशी संबंधित तीन ठिकाणी काल ईडीने छापेमारी केली होती. राऊत यांच्या दादर येथील फ्लॅटवर, तसेच गोरेगाव येथील पत्राचाळ येथे देखील काल सर्च ऑपरेशन झाले असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कागदपत्रे ईडीने जप्त केली आहेत. तसेच, संजय राऊत यांच्या घरून 11 लाख 25 हजार इतकी रक्कम देखील जप्त करण्यात आली आहे.
संजय राऊत यांना ईडीकडून अटक -पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांची त्यांच्या घरी काल सकाळी 7 ते सध्याकाळी 4 वाजेपर्यंत चौकशी झाली. त्यानंतर ईडीने त्यांना कार्यालयात नेले व तेथे चौकशी केली. त्यानंतर साडेअकराच्या सुमारास राऊत यांना अटक करण्यात आल्याचे ईडीच्या सुत्रांनी सांगितले. संजय राऊत यांच्या घरी ईडीकडून तपास सुरू असताना मोठ्या प्रमाणात शिवसैनिक घराबाहेर जमले होते. यावेळी गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. चौकशीदरम्यान संजय राऊत यांनी खिडकीतून समर्थकांकडे हातवारे देखील केले होते.
पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरण नेमकं काय आहे? -पत्रा चाळ परिसरातील बैठ्या घरांमध्ये राहात असलेल्या 672 कुटुंबीयांचा पुनर्विकास करण्यासाठी 2008 मध्ये मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्सची रहिवाशांनी नियुक्ती केली. ही घरे भाडेतत्त्वावर असल्यामुळे त्यासाठी म्हाडाची परवानगी आवश्यक होती. म्हाडानेही त्यास तयारी दाखवत विकासक आणि सोसायटीसमवेत करारनामा केला. याअंतर्गत मूळ रहिवाशांचे मोफत पुनर्वसन केल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या बांधकामामध्ये विकासक आणि म्हाडामध्ये समान हिस्सा राहणार होता. मात्र म्हाडा अधिकाऱ्यांनी जमिनीची मोजणी कमी केल्यामुळे विकासकाला 414 कोटी रुपयांचा फायदा झाल्याचा आक्षेप निवासी लेखापरीक्षण विभागाने घेतला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी म्हाडावर जोरदार ताशेरे ओढले. त्यानंतर त्यास जबाबदार असलेल्या कार्यकारी अभियंत्यांना निलंबित करण्यात आले. एका महिन्याच्या नोटिशीची मुदत संपल्यावर विकासकाची उचलबांगडी करण्यात आली. मात्र विकासकाला पुनर्वसनातील सदनिका बांधण्याआधीच विक्रीची परवानगी देणाऱ्या तत्कालीन वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यावर काहीही कारवाई केली नाही. मात्र त्याचा फटका सामान्य रहिवाशांना बसला आहे. गेली पाच वर्षे भाडे नाही आणि हक्काचे घरही गमावावे लागले आहे.
आक्षेप असणारा जमीन व्यवहार काय? -पत्रा चाळ परिसराचे मूळ क्षेत्रफळ 1,93,599 चौरस मीटर विकास करारनाम्यात 1,65,805 चौरस मीटर म्हणजे 27,794 चौरस मीटर कमी दाखविण्यात आले. म्हाडाच्या वाटय़ाला येणाऱ्या 50 टक्के म्हणजे 13,897 चौरस मीटर जागेचा विकासकाला फायदा करून दिल्याप्रकरणी कार्यकारी अभियंता एस. डी. महाजन निलंबित झाले आहेत.