मुंबई - शहर व उपनगरात गेल्या दोन महिन्यांत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याचवेळी मुंबईत बेस्टमध्ये अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची बाधा होत आहे. गेल्या तीन महिन्यांत बेस्टचे तब्बल ३८७ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर सुरूवातीपासून आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या ३१५० कर्मचाऱ्यांपैकी ३००४ कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे. ५ टक्क्यांहून कमी प्रमाणात पॉझिटिव्ह येणे हे जागतिक आरोग्य संघटनेच्या मते चांगले प्रमाण आहे.
५ टक्क्यांहून कमी पॉझिटिव्ह -
मुंबईची सेकंड लाईफलाईन समजली जाणाऱ्या बेस्टकडून परिवहन सेवा दिली जाते. कोरोना काळात ट्रेन बंद असताना अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना नियोजित स्थळी पोहचवण्याचे काम बेस्टने केले. तेव्हापासून आतापर्यंत बेस्टचे सुमारे ३१५० कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाले. त्यापैकी ९५ टक्के म्हणजेच ३००४ कर्मचाऱ्यांनी कोरोनावार मात केली आहे.