मुंबई - मुंबईत डिसेंबर महिन्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ (Corona Cases Hike in Mumbai) झाली आहे. तसेच ओमायक्रॉन रुग्णही आढळून(Omicron Cases Hike) येत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग चाचण्या(Genome Sequencing Test) केल्या जात आहेत. या चाचण्यांच्या सातव्या फेरीत मुंबईत ‘ओमायक्रॉन’चे (Omicron) ५५ टक्के रुग्ण आढळून आले होते. पालिकेने केलेल्या आठव्या फेरीतील चाचण्यांमध्ये ओमायक्रॉनचे ८९ टक्के रुग्ण आढळून आले आहेत. तर ८ टक्के डेल्टा डेरिव्हेटीव्हचे, ३ टक्के डेल्टा व्हेरिअंटचे रुग्ण आढळून आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
- २८० पैकी ८९ टक्के ‘ओमायक्रॉन’चे रुग्ण -
मुंबईत गेले पावणे दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. या प्रसारादरम्यान कोरोनाच्या तीन लाटा आल्या आहेत. या लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. डिसेंबरपासून तिसऱ्या लाटेत कोरोनाचा नवीन व्हेरियंट असलेल्या ओमायक्रॉनच्या रुग्णातही वाढ झाली आहे. मुंबईत कोणत्या प्रकारच्या विषाणूचे रुग्ण आढळून येत आहेत, त्या विषाणूचा किती प्रसार झाला आहे याची माहिती मिळवण्यासाठी पालिकेकडून वेळोवेळी नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग चाचण्या केल्या जात आहेत. पालिकेकडून ८ व्या फेरीतील चाचण्यांसाठी ३७३ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी २८० नमुने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील होते, तर उर्वरित नमुने हे बृहन्मुंबई मनपा क्षेत्राबाहेरील होते. बृहन्मुंबई मनपा क्षेत्रातील २८० नमुन्यांपैकी ८९ टक्के म्हणजेच २४८ नमुने हे ‘ओमायक्रॉन’ या व्हेरियंटचे असल्याचे निदर्शनास आले. ८ टक्के म्हणजेच २१ नमुने हे ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ या व्हेरियंटचे, तर उर्वरित सुमारे ३ टक्के म्हणजेच ११ नमुने हे इतर व्हेरियंटचे असल्याचे आढळून आले आहे. या ११ नमुन्यांपैकी २ नमुने हे ‘डेल्टा व्हेरिअंट’ या व्हेरियंटचे असल्याचे निदर्शनास आले आहेत, अशी माहिती महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.
- ३४ टक्के रुग्ण हे २१ ते ४० वयोगटातील -
८ व्या फेरीतील चाचणींमधील २८० रुग्णांपैकी ३४ टक्के म्हणजे ९६ रुग्ण हे २१ ते ४० या वयोगटातील आहेत. या खालोखाल २८ टक्के म्हणजेच ७९ रुग्ण हे ४१ ते ६० या वयोगटातील आहेत. २५ टक्के म्हणजेच ६९ रुग्ण हे ६१ ते ८० या वयोगटातील आहेत. ८ टक्के म्हणजेच २२ रुग्ण हे '० ते २०' या वयोगटातील; तर ५ टक्के म्हणजे १४ रुग्ण हे ८१ ते १०० या वयोगटातील आहेत. चाचण्या करण्यात आलेल्या २८० नमुन्यांमध्ये ० ते १८ या वयोगटातील १३ नमुन्यांचा समावेश होता. ज्यापैकी, २ नमुने ० ते ५ वर्षे या वयोगटातील, ४ नमुने ६ ते १२ वर्षे या वयोगटातील; तर ७ नमुने १३ ते १८ वर्षे या वयोगटातील होते. हे सर्व नमुने ‘ओमायक्रॉन’ या व्हेरियंटचे असल्याचे आढळून आले. तथापि, या रुग्णांना कोविड बाधा झाल्याची कोणतीही गंभीर लक्षणे दिसून आलेली नाहीत.
- लस न घेतलेल्या १२ रुग्णांना ऑक्सिजनची गरज -