मुंबई - उत्तरप्रदेश येथील लखीमपूर खीरी घटनेच्या निषेधार्थ आज (सोमवार) राज्यातील सत्ताधारी पक्षांकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. या बंद दरम्यान बेस्टच्या 8 बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे पोलिसांकडे संरक्षण मागण्यात आले असून पोलीस संरक्षणात बस सेवा सुरू करण्याचा निर्णय बेस्टकडून घेण्यात आला आहे. सकाळी गर्दीच्या वेळी बसेस डेपोमध्येच उभ्या असल्याने मुंबईकरांचे हाल झाले.
महाराष्ट्र बंद दरम्यान बेस्टच्या 8 बसेसची तोडफोड, प्रशासनाने मागितले पोलीस संरक्षण - MVA Bandh
उत्तरप्रदेश येथील लखीमपूर खीरी घटनेच्या निषेधार्थ आज (सोमवार) राज्यातील सत्ताधारी पक्षांकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. या बंद दरम्यान बेस्टच्या 8 बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे पोलिसांकडे संरक्षण मागण्यात आले असून पोलीस संरक्षणात बस सेवा सुरू करण्याचा निर्णय बेस्टकडून घेण्यात आला आहे. सकाळी गर्दीच्या वेळी बसेस डेपोमध्येच उभ्या असल्याने मुंबईकरांचे हाल झाले.
8 बसेसची तोडफोड -
उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरीमध्ये आंदोलक शेतकर्यांवर गाडी चालवून त्यांना चिरडून मारण्याच्या घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. रात्रीपासून बंदला सुरुवात झाली. बंदमध्ये बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन बेस्ट कामगार सेनेने केले होते. या दरम्यान बेस्टच्या बसेस डेपो बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात असतानाच धारावी, शिवाजी नगर, मालवणी आदी ठिकणी बसवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली आहे. यामुळे बेस्टच्या 8 बसेसचे नुकसान झाले आहे.