महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई कोरोना अपडेट : कोरोनाचे आढळले 792 नवे रुग्ण, तर 22 मृत्यू - कोरोना महामारी मुंबई

मुंबईत कोरोनाच्या नव्या 792 रुग्णांची नोंद झाली असून 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या सव्वीस दिवसात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 69 वरून 208 दिवस इतका वाढली आहे. बईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 62 हजार 476 वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा 10 हजार 396 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आज 205 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला

मुंबई कोरोना अपडेट
मुंबई कोरोना अपडेट

By

Published : Nov 6, 2020, 10:44 PM IST

मुंबई - मुंबईत मार्च पासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांचा संख्येत वाढ होत होती. मात्र गेल्या काही दिवसात पुन्हा रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे दिसून येत आहे. आज मुंबईत कोरोनाच्या नव्या 792 रुग्णांची नोंद झाली असून 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या सव्वीस दिवसात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 69 वरून 208 दिवस इतका वाढल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

रुग्ण आणि मृतांचा आकडा कमी झाला -

मुंबईत आज (शुक्रवारी) कोरोनाचे 798 नवे रुग्ण आढळून आले असून 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 18 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 18 पुरुष तर 4 महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 62 हजार 476 वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा 10 हजार 396 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आज 205 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 35 हजार 412 वर गेला आहे. सध्या मुंबईत 15 हजार 962 सक्रिय रुग्ण आहेत.

रुग्ण दुप्पटीचा कालावधी 208 दिवसांवर -
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90 टक्क्यांवर पोहोचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 208 दिवस तर सरासरी दर 0.33 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 541 चाळी आणि झोपडपट्टी कंटेनमेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 6 हजार 541 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 15 लाख 94 हजार 599 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details