मुंबई -मुंबईत गेले काही दिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजारांवर रुग्ण आढळून येत होते.. त्यात गेल्या काही दिवसांत घट झाली आहे. आज 733 नवे रुग्ण आढळले असून 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 732 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईमधील कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे, त्यामुळे काल रुग्ण दुप्पटीचा कालावधी 598 दिवस होता, त्यात एकाच दिवसात 35 दिवसांची वाढ होऊन तो 633 दिवसांवर पोहचला आहे.
हेही वाचा -ठाण्याच्या खाडीमार्गे दारूची तस्करी रोखण्यासाठी, राज्य उत्पादन शुल्क खात्याला मिळाल्या 8 बोटी
मुंबईत आज 733 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 15 हजार 879 वर पोहचला आहे. आज 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 15 हजार 164 वर पोहचला आहे. आज 732 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 6 लाख 82 हजार 678 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 15 हजार 798 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 633 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 21 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर, 95 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज 29 हजार 174, तर आतापर्यंत एकूण 65 लाख 90 हजार 371 चाचण्या करण्यात आल्या, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.