मुंबई - राज्यात आज १३,२४७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे कोरोनावर मात करून बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा १४,४५,१०३ वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.५२ टक्क्यांवर पोहोचले आहे. दिवसभरात राज्यात आज ७,३४७ कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून राज्यातील उपचाराखाली असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या देखील कमी होऊन १,४३,९२२ एवढी कमी झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
राज्यात ७,३४७ नवे कोरोना पॉझिटिव्ह; १३,२४७ रुग्णांना डिस्चार्ज, १८४ रुग्णांचा मृत्यू - महाराष्ट्र कोरोना अपडेट
राज्यात चोवीस तासात ७,३४७ करोनाबाधितांची नोंद झाली असून १८4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १३,२४७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
नवे कोरोना पॉझिटिव्ह
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८४,७९,१५५ नमुन्यांपैकी १६,३२,५४४ नमुने पॉझिटिव्ह (१९.२५ टक्के) आले आहेत. राज्यात २४,३८,२४५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या १३,५४५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १८४ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून एकूण ४३,०१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.