महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

MH CORONA : रुग्णसंख्या वाढ सुरूच.. आज ६,६८६ नवे रुग्ण, १५८ जणांचा मृत्यू - महाराष्ट्र कोरोना अपडेट

राज्यात आज ६ हजार ६८६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात राज्यात १५८ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.११ टक्के एवढा आहे. दुसरीकडे आज राज्यात ५ हजार ८६१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६१ लाख ८० हजार ८७१ कोरोनाबाधित रुग्णांनी करोना मात केली आहे. यामळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८५ % एवढे झाले आहे.

Maharashtra corona update
Maharashtra corona update

By

Published : Aug 13, 2021, 9:31 PM IST

मुंबई -राज्यात सोमवारी ४ हजार ५०५, मंगळवारी ५ हजार ६०९, बुधवारी ५ हजार ५६० तर गुरुवारी ६ हजार ३८८ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. आज त्यात किंचित वाढ होऊन ६६८६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर सोमवारी ६८, मंगळवारी १३७, बुधवारी १६३, गुरुवारी २०८ मृत्यूची नोंद झाली होती. आज त्यात घट होऊन १५८ मृत्यूंची नोंद झाली. राज्यात गेले काही दिवस रुग्ण आणि मृत्यू संख्येत चढउतार सुरू आहे.

५,८६१ रुग्णांना डिस्चार्ज -

राज्यात गुरुवारी ५,८६१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६१,८०,८७१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८५ टक्के एवढे झाले आहे. मंगळवारी राज्यात ६,६८६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून १५८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १,३४,७३० मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,०५,४५,५५२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,८२,०७६ (१२.६३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,७०,८९० व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात ६३,००४ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

मृत्यूदर २.११ टक्के -

१९ जुलैला ६६, २० जुलैला १४७, २१ जुलैला १६५, २२ जुलैला १२०, २३ जुलैला १६७, २४ जुलैला २२४, २५ जुलैला १२३, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, २९ जुलैला १९०, ३० जुलैला २३१, ३१ जुलैला २२५, १ ऑगस्टला १५७, २ ऑगस्टला ९०, ३ ऑगस्टला १७७, ४ ऑगस्टला १९५, ५ ऑगस्टला १२०, ६ ऑगस्टला १८७, ७ ऑगस्टला १२८, ८ ऑगस्टला १५१, ९ ऑगस्टला ६८, १० ऑगस्टला १३७, ११ ऑगस्टला १६३, १२ ऑगस्टला २०८, १३ ऑगस्टला १५८ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात मृत्यूदर २.११ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

..या विभागात सर्वाधिक रुग्ण -

  • मुंबई - २८४
  • रायगड - १३५
  • अहमदनगर - १०१९
  • पुणे - ६७३
  • पुणे पालिका - २७४
  • पिपरी चिंचवड पालिका - २२५
  • सोलापूर - ७८४
  • सातारा - १०२०
  • कोल्हापूर - ४०६
  • सांगली - ६२६
  • सांगली मिरज कुपवाडा पालिका - ११८
  • सिंधुदुर्ग - ९२
  • रत्नागिरी - १६७
  • उस्मानाबाद - ७७
  • बीड - १२७

ABOUT THE AUTHOR

...view details