महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Best Workers Positive : बेस्टच्या 66 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, सहा जणांना डिस्चार्ज

मुंबईत गेले पावणे दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. मार्च 2020 मध्ये मुंबईसह देशभरात लॉकडाऊन लावण्यात आला. मुंबईकरांची लोकल ट्रेन बंद करण्यात आली. त्यावेळी आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्करना नियोजित स्थळी पोहचवण्याचे काम बेस्ट उपक्रमाकडून करण्यात आले.

Best Workers Positive
Best Workers Positive

By

Published : Jan 5, 2022, 12:48 PM IST

मुंबई - मुंबईकरांना परिवहन सेवा देणाऱ्या बेस्ट उपक्रमाचे गेल्या आठवडाभरात तब्बल 66 कर्मचारी कोरोना पॉजिटिव्ह आले आहेत. त्यापैकी 6 कर्मचाऱ्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून 60 कर्मचारी अद्यापही क्वारेंटाईन आणि रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली आहे.

बेस्टची नागरिकांसाठी सेवा-

मुंबईत गेले पावणे दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. मार्च 2020 मध्ये मुंबईसह देशभरात लॉकडाऊन लावण्यात आला. मुंबईकरांची लोकल ट्रेन बंद करण्यात आली. त्यावेळी आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्करना नियोजित स्थळी पोहचवण्याचे काम बेस्ट उपक्रमाकडून करण्यात आले. मुंबईत लोकल सेवा सामान्य प्रवाशांना खुली करण्यात आली तरीही लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. यामुळे आजही बहुसंख्य प्रवासी बेस्टच्या बसने प्रवास करत आहेत. बेस्टमधून लॉकडाऊनच्या कालावधीत 10 ते 12 लाख आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी प्रवास करत होते. सध्या बेस्टमधून तब्बल 28 लाख प्रवासी रोज प्रवास करत आहेत.

66 कर्मचारी कोरोना पॉजिटीव्ह -

मुंबईत डिसेंबर महिन्यात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. 27 डिसेंबरपासून आठवडाभरात बेस्टचे 66 ड्रायव्हर व इतर कर्मचारी कोरोना पॉजिटीव्ह आले आहेत. या पॉजिटीव्ह कर्मचाऱ्यांना क्वारेंटाईन तसेच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी 6 कर्मचाऱ्यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अद्यापही 60 कर्मचारी पॉजिटीव्ह असल्याचे माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details