मुंबई -मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांचा संख्येत वाढ होत होती. ऑक्टोबर महिन्यापासून रुग्ण संख्या आटोक्यात आली. त्यानंतर पुन्हा रुग्ण संख्या वाढू लागली. 16 नोव्हेंबरला रुग्ण संख्या 409 पर्यंत खाली आली होती. गेले काही दिवस रुग्ण संख्येत वाढ झाली होती. मात्र आता पुन्हा काही प्रमाणात रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. मुंबईत गेल्या 24 तासांमध्ये 606 नवे रुग्ण आढळून आले असून, 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत रविवारी कोरोनाचे 606 नवे रुग्ण आढळून आले असून, 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 9 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 2 लाख 90 हजार 629 वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा 10 हजार 981 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आज 402 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 66 हजार 162 वर गेला आहे. सध्या मुंबईत 12 हजार 654 सक्रिय रुग्ण आहेत.