मुंबई - राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून यावर उपाययोजना करण्यासाठी केंद्राकडून लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढविण्यात आले. त्यानंतर राज्यभर कलम 144 लागू असून संचारबंदी लागू करण्यात आलेले आहे. 22 मार्च ते 21 एप्रिल या काळामध्ये संपूर्ण राज्यात एकूण 60005 गुन्हे नोंदविण्यात आले असून क्वारंटाईनच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या 589 जणांवर राज्यभरात कारवाई करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात राज्यभरात पोलिसांवर हल्ला होण्याच्या 121 घटना घडल्या आहेत. या गुन्ह्यात 411 आरोपीना अटक करण्यात आली आहे.
कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा फटका मुंबई पोलीस खात्याला बसला आहे. तब्बल 11 पोलीस अधिकारी व 38 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोना पॉजीटिव्ह रिपोर्ट आला आहे. लॉकडाऊनच्या काळात कोविड 19 च्या संदर्भात 74115 फोन कॉल 100 क्रमांकाच्या नियंत्रण कक्षावर आले. अनधिकृत वाहतुकीचे 1062 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अनधिकृत वाहतूक प्रकरणी 13381 जणांना अटक करण्यात आली असून तब्बल 41468 वाहन जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी या काळात 2 कोटी 30 लाख 73 हजारांचा दंड थोटावला आहे.