मुंबई - मुंबईतील विलेपार्ले परिसरात कोविड सेंटरच्या बाहेर मद्यधुंद अवस्थेत तरुण नाचतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. कारमधील स्पीकर मोठ्याने लावून हे ६ तरुण थिरकत होते. या सर्व तरुणांवर विलेपार्ले पोलिसांनी गुन्हा दाखल करीत त्यांचे वाहन जप्त केले आहे.
कोविड सेंटरच्या बाहेर 6 तरुणांचा डान्स, पोलिसांनी केला गुन्हा दाखल - Video of young dancing
रुग्णालयाच्या बाहेर कर्णकर्कश आवाजात स्पीकर लावून डान्स करणाऱ्या मद्यधुंद तरुणांवर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. यासंदर्भात विलेपार्ले पोलिसांनी 6 जणांच्या विरोधात कलम 188 अंतर्गत गुन्हा नोंदविला असून एक वाहन सुद्धा जप्त केले आहे.
मुंबईतील विलेपार्ले परिसरात कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी शिरोडकर रुग्णालय महापालिकेकडून ताब्यात घेण्यात आले होते. शनिवारी रात्री उशिरा 6 तरुण हे 2 चारचाकी वाहनातून आले असता यातील काही तरुणांनी गाडीच्या बाहेर येऊन कर्णकर्कश आवाजात गाडीचा स्पीकर वाजवत रस्त्यावर नाचण्यास सुरवात केली. या तरुणांचा हा धांगडधिंगा बराच वेळ चालू असताना या ठिकाणी असलेल्या काही नागरिकांनी याचा व्हीडिओ रेकॉर्ड केला होता. या संदर्भात विलेपार्ले पोलिसांनी 6 जणांच्या विरोधात कलम 188 अंतर्गत गुन्हा नोंदविला असून त्यांचे वाहन जप्त केले आहे.