महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

वरळी लिफ्ट दुर्घटनेत आणखी एकाचा मृत्यू; मृतांचा आकडा ६ वर

रविवारी जखमी अवस्थेत असलेल्या लक्ष्मण मंडल या मजुराचाही मृत्यू झाला. यामुळे या घटनेतील मृतांचा आकडा सहावर पोहचला आहे.

वरळी लिफ्ट दुर्घटना
वरळी लिफ्ट दुर्घटना

By

Published : Jul 26, 2021, 1:43 AM IST

मुंबई -वरळी येथील लिफ्ट दुर्घटनेतील मृतांची संख्या ६ वर पोहोचली आहे. अंबिका डेव्हलपरच्या माध्यमातून नवीन इमारत बांधण्याचे काम सुरू असताना इमारतीची लिफ्ट कोसळून शनिवारी पाच कामगारांचा मृत्यू तर एक जण जखमी झाला. जखमीवर परळ येथील केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र रविवारी या कामगाराचाही मृत्यू झाला.


वरळी येथील बीडीडी चाळ क्रमांक ११९ समोरील ललित अंबिका विकासक यांच्याकडून बांधकाम करण्यात आलेली श्री. लक्ष्मी को-ऑप- हौसिंग सोसायटीच्या वाहन पार्किंग बांधकामाच्या ठिकाणी लिफ्ट शनिवारी सायंकाळी १७ व्या मजल्यावरून कोसळून दुर्घटना घडली होती. मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन ६ मजुरांना बाहेर काढून केईएम व नायर रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा-26 जुलै राशीभविष्य : मिथून राशी वाल्यांना आज प्रतिकूलतेला तोंड द्यावे लागेल; जाणून घ्या बाकी राशींचे भविष्य

मृतांचा आकडा सहावर -
केईएम रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच अविनाश दास याचा मृत्यू झाला होता. लक्ष्मण मंडल हा मजूर गंभीररीत्या जखमी असल्याने त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. तर भारत मंडल, चिन्मय मंडल, अनिलकुमार यादव, अभय यादव या चार जणांना नायर रुग्णालयात दाखल केले. त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. केईएम रुग्णालयात 1 तर नायर रुग्णालयात 4 अशा एकूण 5 जणांचा शनिवारी मृत्यू झाला.

हेही वाचा-KARGIL VIJAY DIWAS द्रासमध्ये शहीद जवानांचे स्मरण; विविध कार्यक्रमांचे आयोजन

दोन जणांना अटक -
शनिवारी या दुर्घटनेनंतर घटनास्थळी वरळी मतदार संघाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी धाव घेऊन घटनेची पाहणी केली. त्यांनी दोषींवर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. या प्रकरणी शनिवारी रात्री उशिरा बांधकाम साईट सुपरवायझर स्वप्नील म्हामुणकर आणि कंत्राटदार मुकेशभाई पारसिया या दोघांना एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. अटकेतील आरोपींनी कामगारांना सेफ्टी बेल्ट, हेल्मेट यासारख्या सुविधा पुरवल्या नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details