मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश केला आहे. शनिवारी एनसीबीने ही कारवाई केली. या कारवाईत 500 ग्राम अमली पदार्थ जप्त करण्यात आला. अमली पदार्थाचे नाव अॅम्फेटामाईन, असे आहे. ही तस्करी मुंबईहून थेट न्यूझीलंडला होणार होती. मात्र, त्या पूर्वीच तस्कराचा कारभार एनसीबीने उघड केला.
हेही वाचा -पदोन्नती आरक्षण : राज्यभरात आक्रोश मोर्चा.. नेमका वाद काय? कधीपासून दिलं गेलं हे आरक्षण?
गुप्त माहितीच्या आधारे एनसीबीचे मुंबई प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात अंधेरी परिसरात छापा टाकण्यात आला. त्यांना एका इंडक्शन कूक टॉपचे पॅकिंग सुरू असल्याचे आढळले. हा कूक टॉप जेव्हा उघडला तेव्हा त्यात 500 ग्राम अॅम्फेटामाईन आढळून आले. हे ड्रग्ज न्यूझीलंडमधील ख्राइस्टचर्च येथे पाठविण्यात येणार होते. मात्र, त्यापूर्वीच हा कट उघळण्यात आला. दरम्यान, एनसीबीने या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा -मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस व्हिस्टाडोम कोच घेऊन धावली