महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत गुरूवारी 46 हजार 743 लाभार्थ्यांचे लसीकरण - mumbai latest news

मुंबईत गुरूवारी 46 हजार 743 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. लसीकरण केंद्रावर आतापर्यंत 18,43,429 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.

मुंबई
मुंबई

By

Published : Apr 15, 2021, 9:31 PM IST

मुंबई -शहरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत आतापर्यंत आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स यांना लस देण्यात येत होती. 1 मार्चपासून 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षावरील आजार असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. आज मुंबईत 46 हजार 743 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत एकूण 18 लाख 43 हजार 429 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

लसीकरणाची आकडेवारी -

मुंबईत आज 46 हजार 743 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यातील 36 हजार 546 लाभार्थ्यांना पहिला तर 10 हजार 197 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 18 लाख 43 हजार 429 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 16 लाख 22 हजार 930 लाभार्थ्यांना पहिला तर 2 लाख 20 हजार 499 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 62 हजार 209 आरोग्य कर्मचारी, 2 लाख 88 हजार 823 फ्रंटलाइन वर्कर्स, 7 लाख 16 हजार 965 ज्येष्ठ नागरिक तर 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार असलेल्या 5 लाख 75 हजार 432 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

असे झाले लसीकरण -

मुंबई महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर 25 हजार 076 तर आतापर्यंत 11 लाख 94 हजार 052 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारच्या रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज 5 हजार 339 लाभार्थ्यांना तर एकूण 1 लाख 28 हजार 755 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज 16 हजार 328 लाभार्थ्यांना तर आतापर्यंत एकूण 5 लाख 20 हजार 622 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.

एकूण लसीकरण -

आरोग्य कर्मचारी - 2,62,209

फ्रंटलाइन वर्कर्स - 2,88,823

ज्येष्ठ नागरिक - 7,16,9654

5 ते 59 वय - 5,75,432

एकूण - 18,43,429

ABOUT THE AUTHOR

...view details