महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मनसुखच्या हत्येसाठी आरोपींनी 45 लाखांची सुपारी दिली, एनआयएची कोर्टात माहिती - 45 लाखांची सुपारी

25 फेब्रुवारी 2021 ला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण-मुंबई इथल्या अँटिलिया निवास स्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली एक गाडी ठेवली होती. मात्र ही कार मनसुख हिरेन यांच्या मालकीची होती. ही कार चोरी झाली आहे, अशी तक्रार त्याने दिली होती. मात्र 5 मार्च रोजी मनसूखचा मृतदेह ठाणे इथल्या रेतीबंदर येथे सापडला होता.

मनसुखच्या हत्येसाठी आरोपींनी 45 लाखांची सुपारी
मनसुखच्या हत्येसाठी आरोपींनी 45 लाखांची सुपारी

By

Published : Aug 4, 2021, 9:49 AM IST

Updated : Aug 4, 2021, 12:58 PM IST

मुंबई- अँटिलिया बाहेरील स्फोटकासह सापडलेल्या कार प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून(एनआयए) सुरू आहे. या प्रकरणाशी निगडीत मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयने एक नवीन धक्कादायक खुलासा कोर्टात केला आहे. मनसुख हिरेन यांच्या हत्येसाठी या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या आरोपींनी एका आरोपीला तब्बल 45 लाख रुपयांची सुपारी दिली होती, अशी माहिती एनआयएने न्यायलायत दिली आहे. तसेच राष्ट्रीय तपास यंत्रणेने या प्रकरणात कोर्टात चार्जशीट दाखल करण्यासाठी आणखी तीस दिवसांची वेळ मागितली आहे.

25 फेब्रुवारी 2021 ला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण-मुंबई इथल्या अँटिलिया निवास स्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली एक गाडी ठेवली होती. मात्र ही कार मनसुख हिरेन यांच्या मालकीची होती. ही कार चोरी झाली आहे, अशी तक्रार त्याने दिली होती. मात्र 5 मार्च रोजी मनसूखचा मृतदेह ठाणे इथल्या रेतीबंदर येथे सापडला होता.

आतापर्यंत 150 जणांचे नोंदवले जबाब-

एन आय एनं आता पर्यंत दीडशे जणांचे जबाब नोंदवले आहेत. तसेच या प्रकरणात एकाचा जबाब दिल्लीमध्ये जाऊन नोंदवला गेला आहे. या प्रकरणात एन्काऊंटर स्पेशलिस्ट आणि माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे या दोघांना अटक केली असल्याचे देखील कोर्टात एनआयएकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान एनआयएने या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी न्यायालयाकडे आणखी 30 दिवसांचा अवधी मागितला आहे. तर चार्जशीट दाखल झाला नाही म्हणून सचिन वाझे याने यापूर्वी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.

Last Updated : Aug 4, 2021, 12:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details