मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याचे चित्र दिसत असून रुग्णसंख्येत घट झाली आहे. आज रविवारी (दि. 22 ऑगस्ट) राज्यात कोरोनाच्या 4141 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 145 मृत्यूंची नोंद झाली आहे. रविवारी राज्यात एकूण 4780 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील मृत्यूदर 2.11 टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के इतके असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात कोरोनाचे 4141 नवे रुग्ण, 145 मृत्यू - कोरोना रुग्ण
राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याचे चित्र दिसत असून रुग्णसंख्येत घट झाली आहे. आज रविवारी (दि. 22 ऑगस्ट) राज्यात कोरोनाच्या 4141 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 145 मृत्यूंची नोंद झाली आहे. रविवारी राज्यात एकूण 4780 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राज्यात 53,182 सक्रीय रुग्ण
राज्यात 4780 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण 62 लाख 31 हजार 999 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के एवढे झाले आहे. राज्यात 4141 नवीन रुग्णांचे निदान झाले असून 145 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण 1 लाख 35 हजार 962 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 22 लाख 92 हजार 131 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64 लाख 24 हजार 651 (12.29 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3 लाख 12 हजार 151 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात 53 हजार 182 सक्रीय रुग्ण आहेत.
मृत्यूदर 2.11 टक्के
19 जुलैला 66, 24 जुलैला 224, 26 जुलैला 53, 27 जुलैला 254, 28 जुलैला 286, 30 जुलैला 231, 31 जुलैला 225, 1 ऑगस्टला 157, 2 ऑगस्टला 90, 3 ऑगस्टला 177, 4 ऑगस्टला 195, 5 ऑगस्टला 120, 6 ऑगस्टला 187, 7 ऑगस्टला 128, 8 ऑगस्टला 151, 9 ऑगस्टला 68, 10 ऑगस्टला 137, 11 ऑगस्टला 163, 12 ऑगस्टला 208, 13 ऑगस्टला 158, 14 ऑगस्टला 134, 15 ऑगस्टला 130, 16 ऑगस्टला 100, 17 ऑगस्टला 116, 18 ऑगस्टला 158, 19 ऑगस्टला 154, 20 ऑगस्टला 105, 21 ऑगस्टला 145, 22 ऑगस्टला 145 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात मृत्युदर 2.11 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.
या विभागात सर्वाधिक रुग्ण
मुंबई - 294
रायगड - 95
पनवेल पालिका - 50
अहमदनगर - 518
पुणे - 430
पुणे पालिका - 217
पिपरी चिंचवड पालिका - 112
सोलापूर - 476
सातारा - 643
कोल्हापूर - 103
सांगली - 400
सांगली मिरज कुपवाडा पालिका - 70
सिंधुदुर्ग - 54
रत्नागिरी - 92
उस्मानाबाद - 58
बीड - 73
हेही वाचा -देशभरात आतापर्यंत मिळाले कोरोना लसीचे 58 कोटी डोस