महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई कोरोनाचे 414 नवे रुग्ण, 4 रुग्णांचा मृत्यू - corona case in mumbai

मुंबईत आज 414 रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 11 हजार 426 वर पोहचला आहे.

मुंबई कोरोना अपडेट
मुंबई कोरोना अपडेट

By

Published : Feb 6, 2021, 8:39 PM IST

मुंबई - मुंबईत मार्च पासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. गेल्या दहा महिन्यात करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात आला आहे. आज (शनिवारी) मुंबईत कोरोनाचे 414 नवे रुग्ण आढळून आले. तर 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

कोरोना रुग्णांची आकडेवारी -

मुंबईत आज 414 रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 11 हजार 426 वर पोहचला आहे. आज 4 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 386 वर पोहचला आहे. 299 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 2 लाख 93 हजार 417 वर पोहचले आहे. मुंबईत सध्या 5708 सक्रिय रुग्ण आहेत.

रुग्ण दुप्पटीचा कालावधी 569 दिवस -

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 566 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 165 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 1 हजार 929 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 28 लाख 96 हजार 224 चाचण्या करण्यात आल्या आहेत.

या दिवशी कमी रुग्णांची नोंद -

मुंबईत मार्च पासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. मुंबईत 7 नोव्हेंबरला 576, 10 नोव्हेंबरला 535, 16 नोव्हेंबरला 409, 18 जानेवारीला 395, 24 जानेवारीला 348, 26 जानेवारीला 342, 1 फेब्रुवारीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.

हेही वाचा-आपले क्षेत्र सोडून बाकी विषयावर बोलताना सचिनने काळजी घ्यावी, शरद पवारांचा सल्ला

ABOUT THE AUTHOR

...view details