मुंबई -मुंबईमध्ये कोरोनाची तिसरी लाट ओसरत असताना डिसेंबर पासून ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण (Omicron Variant in Mumbai) आढळून येत आहेत. आज ओमायक्रॉन व्हेरियंटचे ३२१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून (NIV) प्राप्त झाल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
Mumbai Omicron Update : मुंबईत ओमायक्राॅनचे ३२१ नवे रुग्ण
मुंबई महापालिकेने केलेल्या जिनोम सिक्वेनसिंग चाचण्यांमध्ये ओमायक्रॉनचे (Omicron outbreak in mumbai) तब्बल ३२१ नवे रुग्ण एकाच दिवशी आढळून आले आहेत. यामुळे मुंबईमधील ओमायक्रॉन रुग्णांचा (Omicron Variant in Mumbai) आकडा ९९७ वर गेला आहे.
ओमायक्रॉनचा प्रसार -
मुंबईत मार्च २०२० पासून कोरोना विषाणूचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या तीन लाटा आल्या. यामधील दोन लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. मात्र जगभरात नोव्हेंबर, डिसेंबरपासून ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण आढळून येत आहेत. भारतातही ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून येत असल्याने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या चाचण्या करून त्यांना क्वारेंटाईन केले जाऊ लागले. जे प्रवासी पॉजिटीव्ह येत आहेत त्यांच्या पुण्याच्या एनआयव्ही आणि मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात जिनोम सिक्वेनसिंग चाचण्या केल्या जात आहेत. तसेच मुंबईमधील रुग्णांच्या जिनोम सिक्वेनसिंग चाचण्या केल्या जात आहेत.
३२१ नवे रुग्ण -
मुंबई महापालिकेने केलेल्या जिनोम सिक्वेनसिंग चाचण्यांमध्ये ओमायक्रॉनचे तब्बल ३२१ नवे रुग्ण एकाच दिवशी आढळून आले आहेत. यामुळे मुंबईमधील ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा ९९७ वर गेला आहे. त्यात ३०७ परदेशी प्रवाशांचा तर ६९० मुंबईमधील नागरिकांचा समावेश आहे. आतापर्यंत ३०७ परदेशी प्रवासी तसेच ३६९ मुंबईकर नागरिक अशा एकूण ६७६ रुग्णांनी ओमायक्रॉनवर आत केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
हेही वाचा -Maharashtra Corona Update: राज्यात कोरोनाचे आढळले ४६३९३ नवीन रुग्ण