महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील 26वा साक्षीदार फितूर - मालेगाव बॉम्बस्फोट

मालेगाव बॉम्बस्फोट 2008 प्रकरणातील 26 वा साक्षीदार आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयात फितूर झाला आहे. आज उपस्थित साक्षीदाराने आरोपी क्रमांक 9 प्रसाद पुरोहित यांच्या संबंधित साक्ष नोंदवण्याकरिता न्यायालयात आले असता एनआयएला साक्ष दिली नसल्याचे न्यायालयासमोर सांगितले. त्यानंतर साक्षीदार फितूर म्हणून न्यायालयाने घोषित केला आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील हा साक्षीदार आरोपी कर्नल पुरोहित यांच्या संबंधित होता.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील 26 वा साक्षीदार फितूर
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील 26 वा साक्षीदार फितूर

By

Published : Sep 8, 2022, 5:29 PM IST

मुंबई -मालेगाव बॉम्बस्फोट 2008 प्रकरणातील 26 वा साक्षीदार आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयात फितूर झाला आहे. आज उपस्थित साक्षीदाराने आरोपी क्रमांक 9 प्रसाद पुरोहित यांच्या संबंधित साक्ष नोंदवण्याकरिता न्यायालयात आले असता एनआयएला साक्ष दिली नसल्याचे न्यायालयासमोर सांगितले. त्यानंतर साक्षीदार फितूर म्हणून न्यायालयाने घोषित केला आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील हा साक्षीदार आरोपी कर्नल पुरोहित यांच्या संबंधित होता. आतापर्यंत फितूर झालेल्या साक्षीदारांनांपैकी कर्नल पुरोहित यांच्या संबंधित असलेले साक्षीदार सर्वाधिक असल्याची माहिती या प्रकरणातील आरोपी समीर कुलकर्णी यांनी दिली आहे.


देशात हिंदू दहशतवाद जन्माला आणणारा शब्द मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणापासून अस्तित्वात आला होता. आतापर्यंत 25 जणांनी या खटल्यात साक्ष बदलली आहे. 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी सध्या एनआयएच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. विशेष म्हणजे यापूर्वी झालेल्या सुनावणीतही एनआयएने हजर केलेल्या साक्षीदाराने साक्ष बदलली होती.


काय आहे प्रकरण -29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. शुक्रवारच्या नमाजानंतर मशिदीत मोटारसायकलवर बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता. तर 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. याप्रकरणी एटीएसने प्राथमिक चौकशी केली होती. तीन वर्षांनंतर 2011 मध्ये हे प्रकरण एनआयएकडे वर्ग करण्यात आले. एनआयएच्या विशेष न्यायालयात आता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. भोपाळमधील भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर या प्रकरणात आरोपी आहेत. या प्रकरणातील अन्य आरोपींमध्ये लेफ्टनंट कर्नल पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी, अजय रहीरकर आणि समीर कुलकर्णी यांचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details