महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यात सोमवारी 26 हजार 672 कोरोनाबाधितांची नोंद, 594 जणांचा मृत्यू - New Corona case in state

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, आज राज्यात 26 हजार 672 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरामध्ये 29 हजार 177 रुग्णांनी कोरोवर मात केली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 594 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्र कोरोना अपडेट
महाराष्ट्र कोरोना अपडेट

By

Published : May 23, 2021, 10:48 PM IST

मुंबई -महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, आज राज्यात 26 हजार 672 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरामध्ये 29 हजार 177 रुग्णांनी कोरोवर मात केली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 594 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील कोरोना स्थिती

राज्यात आज 26 हजार 672 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, कोरोनाबाधितांचा एकूण आकडा हा 55 लाख 79 हजार 897 इतका झाला आहे. आज 29 हजार 177 जणांनी कोरोनावर मात केल्याने कोरोनामुक्तांचा एकूण आकडा हा 51 लाख 40 हजार 272 वर पोहोचला आहे. तर गेल्या 24 तासांमध्ये 594 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 3 लाख 48 हजार 395 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यातील 'या' ठिकाणी झाली सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई महानगरपालिकाा- 1427
ठाणे - 250
ठाणे महानगरपालिका-192
नवी मुंबई महानगरपालिका-141
कल्याण डोंबिवली महापालिका- 209
मीरा भाईंदर महानगरपालिका-152
पालघर-243
वसई विरार-270
रायगड-628
पनवेल-122
नाशिक-465
नाशिक मनपा-425
अहमदनगर-1589
अहमदनगर मनपा-128
जळगाव-184
पुणे - 1644
पुणे मनपा-786
पिंपरी चिंचवड महानगरपालिका- 627
सोलापूर-1488
सातारा -2008
कोल्हापूर-1394
कोल्हापूर मनपा-327
सांगली- 1431
सांगली मनपा-177
सिंधुदुर्ग-645
रत्नागिरी-920
लातूर - 268
उस्मानाबाद-540
बीड- 978
अकोला - 301
अकोला मनपा- 183
अमरावती - 773
यवतमाळ-829
बुलढाणा-771
वाशिम-306
नागपूर - 671
नागपूर मनपा-326

हेही वाचा -पुण्यातील पहिले बाल कोविड सेंटर येरवडा येथे सुरू

ABOUT THE AUTHOR

...view details