मुंबई - मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. कोर्टाकडून वारंवार जामीन अर्ज फेटाळला जात आहे. हे होत असतानाचा आता खळबळजनक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अटकेत असलेला आर्यन खानच्या सुटकेसाठी २५ कोटी रुपयांचा सौदा झाल्याचा मोठा खुलासा किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल या व्यक्तीने केला आहे. प्रभाकर साईल हा क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात पंच होता. मात्र, प्रभाकरने स्वतःचा व्हिडिओ व्हायरल करून याप्रकरणातील मोठं बिंग फोडले आहे. यामुळे राज्यात सध्या एकच खळबळ माजली आहे.
माहिती देताना प्रभाकर साईल पंच प्रभाकर साईल काय म्हटला
एनसीबी रेडचा पंच क्रमांक १ असलेला प्रभाकर साईलने याप्रकरणात त्याच्याकडून पंच म्हणून काही रिकाम्या पेपरवर सही घेतल्याचे सांगितले आहे. रेडच्या दिवशी किरण गोसावी प्रभाकर साईलला येलो गेटवर बोलावले आणि त्यानंतर गोसावीला फोनवर बोलताना ऐकलं. या सर्व प्रकरणामुळे साईलच्या जीवाला धोका होता म्हणून तो १०-१२ दिवस सोलपूर येथील परिचिताकडे राहिल्याचे सांगितले.
साईलने आर्यन खानच्या सुटकेसाठी २५ कोटी रुपयांची मागणी
साईलने गोसावीचा लपून व्हिडिओ केला असून त्यात आर्यनला मोबाईलवर बोलायला लावले असल्याचे दिसत आहे. प्रभाकर साईलने आर्यन खानच्या सुटकेसाठी २५ कोटी रुपयांची मागणी केल्याचे सांगितले. पण ही डील १८ कोटींवर झाली. त्यातले ८ कोटी सॅम म्हणजेच समीर वानखेडेंना आणि उर्वरित पैसे आपल्यात वाटू घ्यायचे असे गोसावी यांच्यात ठरले, असे सर्व संभाषण साईलने ऐकल्याचे व्हिडिओतून सांगितले आहे.
८ सप्टेंबरला किरण गोसावीने ठाण्यातील राहत घर सोडलं
प्रभाकर साईल हा किरण गोसावीकडे अंगरक्षक म्हणून २२ जुलै २०२१ला रुजू झाला. पण वैयक्तिक प्रोब्लेममुळे प्रभाकर साईल ३० जुलै २०२१ रोजी सर्व कपडे घेऊन कायमचा किरण गोसावीकडे ठाण्याच्या राहत्या घरी राहायला गेला. प्रभाकर साईलचं राहणं, पगार सर्व काही ठरलं. पण ८ सप्टेंबरला किरण गोसावीने ठाण्यातील राहत घर सोडलं आणि त्यानंतर वाशीला शिफ्ट झाले, असे प्रभाकरने सांगितले आहे.
क्रुझ कारवाईच्या दिवशी काय झालं
प्रभाकर साईल याने सांगितले की, क्रुझ कारवाई झाली त्यादिशी मी किरण गोसावींसोबतच होतो. किरण गोसावी एनसीबी ऑफिसला गेले. मी खालीच थांबलो होतो. गोसावी बरोबर सव्वा बाराला खाली आले. आम्ही तिथून जवळच जाऊ फ्रॅकी, थम्स अप घेतलं. तिथू ग्रीन गेटला गेलो. ग्रीन गेटच्या आत गेलो तिथे समीर वानखेडे, त्यांचे सहकारी बसले होते तिथे त्यांना फ्रॅकी आणि पाणी-थम्सअप वगैरे दिले. नंतर क्रुझच्या बाहेर गेलो. तिथून मला एकाठिकाणी थांबवून बाहेर जाऊ नको असे सांगितलं. मला काही फोटो दाखवण्यात आले होते व ते फोटो असलेले लोक आले की त्यांना ओळखायला सांगितलं होतं. फोटोतल्या व्यक्ती आल्या की मला गोसावींना रिपोर्ट करायचं होतं, असं साईलनं सांगितलं आहे.
बस नाही तर क्रुझवरची व्हिआयपी गाडी आली होती
साईलनं सांगितलं की, क्रुझवर घेऊन जायला एक बस होती. बसमधून कोण जातं त्याला ओळखायला सांगितलं होतं. 2700 नंबरच्या बसमध्ये फोटोमधली एक व्यक्ती बसली त्यालाच मी ओळखलं. बाकीच्यांना ओळखलं नाही कारण सर्वांनीच मास्क घातले होते. 4.29 वाजता मला फोटो दिले त्यातील 13 व्यक्ती आल्या आहेत असा मेसेज दिला. आर्यन खान माझ्यासमोरच आले होते. त्यांना घ्यायला बस नाही तर क्रुझवरची व्हिआयपी गाडी आली होती. कारवाई करतांना मी क्रुझवर नव्हतो. क्रुझच्या गेटवर होतो. क्रुझवर मी 11.30 दरम्यान पोहोचलो होतो.
किरण गोसावींचा काय रोल
साईलनं सांगितलं की, किरण गोसावींकडे मी 22 जूलै पासून बॉडीगार्ड म्हणून काम करतो. ठाण्याला काम करायचो. गोसावी कारवाईच्या अगोदर अहमदाबावरुन निघाले होते. किरण गोसावी पावणेतीनला एनसीबी ऑफीसच्या खाली आले. तेव्हा सॅम नावाचा व्यक्ती गोसावींना भेटायला आला होता..रात्रीतुन दोन वेळा त्यांची मिटींग झाली. साडेचारला एनसीबीहून लोअर परळला निघालो. तेव्हा त्यांनी सॅमला फोन केला. फोनवर म्हणाले उनको बोल 25 करोड में डील करने के लिये. 18 करोड में फायनल कर. 8 करोड वानखेडे को देना हैं' सॅम हा शाहरुख खान आणि गोसावी मधला को ऑर्डीनेटर होता असा दावाही साईलनं केला आहे.
किरण गोसावींनी व्हॉटसअप कॉल केला
साईलनं सांगितलं की मला लोअर परळला दोन गाड्या दिसल्या होत्या. त्यापैकी एका गाडीत पुजा ददलानी होती. किरण गोसावी, सॅम आणि पुजा मध्ये 15-20 मिनीट बोलणं झालं. 3 तारखेच्या साडेपाचला सकाळी पुव्हा गोसावींना सॅमचा फोन आला. पुजा तेव्हा फोन उचलत नाही असं सॅम सांगत होता. किरण गोसावींनी व्हॉटसअप कॉल साडेचार दरम्यान केला होता आणि कारवाईनंतरच्या डीलबाबत सांगितलं. पाचपर्यंत मला पुन्हा किरण गोसावींचा फोन आला. अर्जंट ताडदेव रोडला इंडीयाना हॉटेल बाहेरुन पैसे कलेक्ट करायचे आहेत. तिथे 5201 नंबरची गाडी होती. तिथे दोन कागदी पिशव्यांमधून 50 लाख रुपये घेऊन गाडीत बसून मी सांगितल्याप्रमाणे वाशीला आलो.
मॉलला बोलावून किरण गोसावींनी मला पुन्हा पैशाची पिशवी दिली
वाशीला येऊन मी पैसे सरांना दिले. सर आणि त्यांची मिसेस बॅग घेऊन निघण्याच्या तयारीत होते. संध्याकाळी 5 ला वाशी इनॉर्बीट मॉलला बोलावून किरण गोसावींनी मला पुन्हा पैशाची पिशवी दिली. तिथुन ओलाने मी चर्चगेटला गेलो. ती पिशवी सॅमला दिली. त्या पिशवीत 38 लाख रुपयेच होते. सॅमने याबाबत किरण गोसावीला फोनवरुन विचारलं.गोसावीने दोन दिवसांत व्यवस्था करतो सांगितलं,असं प्रभाकरनं सांगितलं.