मुंबई: अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत (Andheri by election) खरी लढत उद्धव गटाच्या ऋतुजा लटके (Rutuja latke) आणि भाजप-शिंदे गटाचे मुरजी पटेल (Murji Patel) यांच्यात होणार आहे. मात्र या हायप्रोफाइल निवडणुकीच्या रिंगणात तब्बल २५ उमेदवार उतरले असून शुक्रवारी त्यांनी नामांकन अर्ज दाखल केले आहेत.
Andheri By Election: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत तब्बल २५ उमेदवार रिंगणात, जाणून घ्या त्यांची नावे - मुरजी पटेल
अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत (Andheri by election) खरी लढत उद्धव गटाच्या ऋतुजा लटके (Rutuja latke) आणि भाजप-शिंदे गटाचे मुरजी पटेल (Murji Patel) यांच्यात होणार आहे. मात्र या हायप्रोफाइल निवडणुकीच्या रिंगणात तब्बल २५ उमेदवार उतरले असून शुक्रवारी त्यांनी नामांकन अर्ज दाखल केले आहेत.
आठ अपक्ष उमेदवार: अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेली ही निवडणूक राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवारी १४ ऑक्टोबर रोजी शेवटची तारीख होती. लटके आणि पटेल यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत आपापले अर्ज दाखल केले. मात्र त्या व्यतिरिक्त सुमारे २५ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहेत. सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे ठाकरे गटाकडून संदीप नाईक यांचा उमेदवारी अर्ज खबरदारी म्हणून दाखल करण्यात आला आहे. तर उर्वरित छोट्या संघटना, पक्षाचे उमेदवार आणि एकूण आठ अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीतील उमेदवारांची यादी:
उमेदवार | पक्ष |
मुरजी पटेल | भारतीय जनता पक्ष |
ऋतुजा लटके | शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे |
संदीप नाईक | शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे |
संदेश जाधव | पीपल्स पार्टी ऑफ इंडिया |
मनोज नायक | राईट टू रिकॉल |
आकाश नायक | भारत जनाधार पार्टी |
मल्लिकार्जुन पुजारी | महाराष्ट्र विकास आघाडी |
चंदन चतुर्वेदी | उत्तर भारतीय विकास सेना |
राजेश त्रिपाठी | उत्तर भारतीय विकास सेना |
साकिब नफुर इमाम मलिक | ऑल इंडिया महिला एम्पॉवरमेंट पार्टी |
फर्झाना सिराज सय्यद | ऑल इंडिया महिला एम्पॉवरमेंट पार्टी |
अंकुशराव पाटील | राष्ट्रीय मराठा पार्टी/अपक्ष |
बाळा विनायक | आपली अपनी पार्टी |
राकेश विश्वनाथ अरोरा | क्रांतिकारी जय हिंद सेना |
निखिलकुमार ठक्कर | अपक्ष |
चंद्रकांत मोटे | अपक्ष |
अर्जुन मुरडकर | अपक्ष |
निकोलस अलोदा | अपक्ष |
निर्मल नागबतूला | अपक्ष |
मिलिंद कांबळे | अपक्ष |
नीना गणपत खेडेकर | अपक्ष |
वाहिद खान | अपक्ष |