मुंबई- राज्यात मंगळवार नागरिकांसाठी घातवार ठरला. मुंबईतील मालाड भागात भिंत कोसळून १९ जण ठार झाले. तर, कल्याणमध्ये भिंत कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला. शनिवारीच पुण्यातल्या कोंढवा भागात भिंत कोसळून १५ मजुरांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच पुण्यात पुन्हा एकदा भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. आंबेगांव सिंहगड येथील कँम्पसमध्ये सिमाभिंत कोसळली आहे. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच नाशकात निर्माणाधीन पाण्याची टाकी कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला तर, २ जखमी झाले आहेत.
मालाड येथील कुरार भागात ही घटना घडली आहे. रात्री २ वाजल्यापासून या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. येथे अग्निशमन दल आणि NDRF च्या टीमकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे. मालाडजवळच्या कुरार भागात ही धक्कादायक घटना घडली. तर, कल्याणमध्येही भिंत कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला.
शनिवारीच पुण्यातल्या कोंढवा भागात भिंत कोसळून १५ मजुरांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आंबेगांव सिंहगड येथील कँम्पसमध्ये सिमाभिंत कोसळली आहे. या अपघातात ६ जणांचा मृत्यृ झाला आहे. आंबेगाव बुद्रुक परिसरात सुरू असलेल्या एका बांधकाम साईटवर हे मजूर काम करत होते. जवळच त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सिंहगड कॅम्पसच्या सीमाभिंतीलगत या मजुरांच्या तात्पुरत्या झोपड्या होत्या. सर्वजण गाढ झोपेत असताना ही सीमाभिंत अचानक कोसळली आणि त्याखाली मजुरांच्या झोपड्या गाडल्या गेल्या. पडलेल्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली मजूर आणि त्यांचे कुटुंबीय अडकून पडले होते.