महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई कोरोना अपडेट : 1919 रुग्णांना डिस्चार्ज; 648 नवे रुग्ण, 15 रुग्णांचा मृत्यू - मुंबई कोरोना अपडेट

मुंबईत आज 648 रुग्णांची नोंद झाली असून 15 मृत्यूची नोंद झाली आहे. 1919 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण दुप्पटीचा कालावधी वाढत असून तो 713 दिवसांवर पोहचला आहे.

corona
corona

By

Published : Jun 26, 2021, 8:00 PM IST

मुंबई - मुंबईत फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आल्याने रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली असून रुग्णांच्या संख्येत सतत चढउतार सुरू आहे. आज 648 रुग्णांची नोंद झाली असून 15 मृत्यूची नोंद झाली आहे. 1919 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण दुप्पटीचा कालावधी वाढत असून तो 713 दिवसांवर पोहचला आहे.


रुग्ण दुप्पटीचा कालावधी 723 दिवसांवर -

मुंबईत आज 648 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 19 हजार 610 वर पोहचला आहे. आज 15 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 15 हजार 383 वर पोहचला आहे. आज 1919 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 6 लाख 92 हजार 787 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 9 हजार 148 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 723 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 14 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 88 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज 33 हजार 759 तर आतापर्यंत एकूण 70 लाख 11 हजार 947 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

रुग्ण संख्येत चढ उतार सुरूच -


1 मे ला 3908, 9 मे ला 2403, 10 मे ला 1794, 17 मे ला 1240, 25 मे ला 1037, 28 मे ला 929, 8 जूनला 673, 9 जूनला 788, 10 जूनला 660, 11 जूनला 696, 12 जूनला 733, 13 जूनला 700, 14 जून ला 529, 15 जूनला 575, 16 जून ला 830, 17 जून ला 666, 18 जून ला 762, 19 जून ला 696, 20 जून ला 733, 21 जून ला 521, 22 जून ला 570, 25 जून ला 693, 26 जूनला 648 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details