मुंबई - शहरातील चेंबूर येथील चिल्ड्रन होममधील 18 मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आग्रीपाडा येथील सेंट जोसेफ अनाथ आश्रमामध्ये 22 जणांना कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आला होता. यामुळे लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
18 मुले कोरोना पॉझिटिव्ह -
मुंबईच्या चेंबूर येथे चिल्ड्रन होम आहे. यालाच बाल सुधारगृह म्हणून ओळखले जाते. या बाल सुधारगृहात एकूण 102 मुले आहेत. त्यापैकी 25 व 26 ऑगस्ट रोजी दोन मुलांची पालिकेच्या शताब्दी रुग्णालयात चाचणी केली असता त्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर 27 ऑगस्ट रोजी आणखी 16 मुले पॉझिटिव्ह आले आहेत. बाल सुधारगृहामधील एकूण 18 मुले सध्या कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्या सर्वांना व्हिडिओकॉन अतिथी कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.