मुंबई - अंमली पदार्थ तस्करीचे जाळे देशाच्या अनेक भागात पसरले आहे. याची पाळेमुळे खणून काढण्याचे काम एनसीबी करत आहे. अंमली पदार्थ विरोधी कारवाई दरम्यान एनसीबीने मुंबईसह ठाण्यातील अनेक भागात छापेमारी केली. काश्मीरमधून मुंबईत आणलेले 17.50 किलो चरस जप्त करण्यात आले. याची किंमत 9 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते आहे.
काश्मीरमधून मुंबईत आणलेले 17.50 किलो चरस जप्त, एनसीबीची कारवाई
काश्मीरमधून मुंबईत आणलेले 17.50 किलो चरस जप्त करण्यात आले. ही कारवाई एनसीबीने केली.
काश्मीरमधून मुंबईत आणलेले 17.50 किलो चरस जप्त, एनसीबीची कारवाई
मुंबईत चार ठिकाणी छापेमारी -
या प्रकरणात चार ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. पहिली छापेमारी दादर, दुसरी कारवाई ताडदेव, तिसरी परेल तर चौथी छापेमारी ठाणे परिसरात केली गेली. 7 जणांना इंटरसेप्ट केले गेले आहे. दोन जणांना मुंबईतल्या दादर परिसरातून अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 4.50 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. एनसीबीने अमली पदार्थ विरोधी कारवाई करण्यासाठी जे ऑपरेशन रचले होते, त्या ऑपरेशनला ऑपरेशन डार्क असे नाव देण्यात आले होते.