मुंबई - राज्यातील आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती करणार असल्याची माहिती, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. अ आणि ब वर्गातील प्रत्येकी दोन हजार, अशी एकूण चार हजार पदे भरली जाणार आहेत. तर क आणि ड वर्गातील 12 हजार कर्मचार्यांची भरती करण्याची प्रक्रिया लगेच सुरु होईल, असे टोपे म्हणाले.
राज्यातील आरोग्य यंत्रणेवर ताण - टोपे
राज्यात कोरोनाचे संकट वाढते आहे. दिवसागणिक रुग्णसंख्याही वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य विभागातील विविध खात्यात भरतीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता 50 टक्के भरती करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली. परंतु, राज्यातील वाढते कोरोनाचे रुग्ण लक्षात घेता आरोग्य विभागाने ही संपूर्ण भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबवावी अशी मागणी केली.
हेही वाचा -छत्रसाल स्टेडिअममध्ये झालेल्या खूनाप्रकरणी कुस्तीपटू सुशील कुमार दिल्ली पोलिसांच्या रडावर