मुंबई - शहर परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच आहे. आज पुन्हा मुंबईत कोरोना विषाणूचे नवे तब्बल 1 हजार 411 नवे रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 22 हजार 563 वर पोहचला आहे. मुंबईत 43 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 800 वर पोहचला आहे. तर मुंबईतून 600 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या रुग्णांची संख्या 6116 वर पोहचली असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
मुंबईत कोरोनाचे संकट गडद, आज नवीन 1,411 रुग्ण सापडले - latest mumbai corona update
मुंबईत कोरोनाचे नवे 1,411 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 983 रुग्ण गेल्या 24 तासात आढळून आले आहेत. तर 14 ते 16 मे दरम्यान खासगी लॅबमध्ये चाचणी केलेले 428 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
मुंबईत कोरोनाचे नवे 1,411 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 983 रुग्ण गेल्या 24 तासात आढळून आले आहेत. तर 14 ते 16 मे दरम्यान खासगी लॅबमध्ये चाचणी केलेले 428 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. मुंबईत झालेल्या 43 मृत्यूंपैकी 28 मृत्यू गेल्या 24 तासात झाले आहेत. तर 15 मृत्यू 6 ते 15 मे दरम्यान झाले आहेत. या 15 जणांचा मृत्यू कोरोनामुळेच झाल्याचा अहवाल येणे बाकी होता. हा अहवाल आल्यावर त्याची नोंद आजच्या मृतांमध्ये करण्यात आली.
43 मृतांपैकी 32 जणांना दिर्घकालीन आजार होते. 32 पैकी 29 पुरुष तर 14 महिला रुग्ण होते. मृतांपैकी 2 जणांचे वय 40 वर्षाखाली, 20 जणांचे वय 60 वर्षावर तर 21 जणांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान होते. मुंबईमधून 600 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 6116 वर पोहचली असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.