ठाणे - महाराष्ट्र ( Maharashtra ) राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२२ चा इयत्ता बारावीचा ( HSC ) निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. यंदा ठाणे ( Thane ) जिल्ह्याचा निकाल ९२.६७ टक्के लागला असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी दिली. यामध्ये कल्याण ( Kalyan) ग्रामीण क्षेत्रातील ९५.८० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यात कल्याण ग्रामीण क्षेत्रातील सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.
जिल्ह्यात ८८ हजार ४३१ विद्यार्थी उत्तीर्ण -यंदा ठाणे जिल्ह्यातील ९५,४२० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ८८ हजार ४३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ५० हजार ४७७ मुलांपैकी ४६,२९६ मुले उत्तीर्ण झाली. तर ४४,९४३ मुलींपैकी ४२,१३५ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांचा ९१.७१ टक्के निकाल लागला तर मुलींचा ९३.७५ टक्के लागला आहे. त्याचबरोबर कोकण विभागात रायगड पाठोपाठ ठाणे जिल्हाचा सर्वाधिक निकाल लागला आहे.