महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 17, 2020, 8:01 PM IST

ETV Bharat / city

धारावीतील कोरोना रुग्णांची शंभरी पार, एकूण रुग्ण १०१

धारवी परीसरात २४ तासात १५ रुग्ण आढळून आले आहेत. आत्तापर्यंत या परीसरात १०१ रुग्ण आढळू आले आहेत.

101 patients have been found in Dharavi area
धारावीतील कोरोना रुग्णांची शंभरी पार, एकूण रुग्ण १०१

मुंबई - हॉटस्पॉट असलेल्या धारावीत गेल्या २४ तासांत नवे १५ रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे धारावीतील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १०१ वर पोहचली आहे. धारावीतील एका ६२ वर्षीय रुग्णाचा सायन रुग्णालयात मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १० वर पोहोचली आहे. दरम्यान धारावीमधील परिस्थिती हाताळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने १२० डॉक्टर आणि परिचारिकांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे.

धारावीच्या मुस्लिम नगर, माटुंगा लेबर कॅम्प, इंदिरा नगर, लक्ष्मी चाळ, जनता सोसायटी, सर्वोदय सोसायटी, सोशल नगर या परिसरात कोरोनाचे नवे १५ हे रुग्ण आढळले आहेत. धारावीतील डॉ. बलिगा नगर येथे ५ रुग्ण आढळले असून तीन जणाचा मृत्यू झाला, वैभव अपार्टमेंट २, मुकुंद नगर १८, मदिना नगर २, धनवाडा चाळ १, मुस्लिम नगर २१ त्यापैकी १ मृत्यू, सोशल नगर १० त्यापैकी एकाचा मृत्यू, जनता सोसायटी ९, कायलन वाडी ४ त्यापैकी दोघांचा मृत्यू, पीएमजीपी कॉलनी १, मुर्गन चाळ २, राजीव गांधी चाळ ४, शास्त्रीनगर केळा वखार ४, नेहरू चाळ येथे एकाचा मृत्यू, इंदिरा चाळ ४, गुलमोहर चाळ १, ट्राझीटं कॅम्प १, साई राज नगर १ व रामजी चाळ १, सूर्योदय सोसायटी २, लक्ष्मी चाळ २, शिव शक्ती नगर १, माटुंगा लेबर कॅम्प येथे ४ रुग्ण आढळून आले आहेत.

१२० डॉक्टर्स, नर्सची होणार भरती -

मुंबईत दाटीवाटीचा परिसर असलेल्या धारावीत कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर, कोरोनाला रोखण्यासाठी तात्काळ २० डॉक्टर्स, ५० परिचारिका, ५० वॉर्डबॉय आणि शिपायांची भरती केली जाणार आहे. कोरोना सेन्टरमध्ये यांची नेमणूक केली जाणार असून डॉक्टरांसाठी एमबीबीएस / बीएएमएस / बीएचएमएस, परिचारिकांसाठी पदवी / पदविका नर्सिंग आणि मिड वायफरी (महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलमध्ये नोंदणीकृत) तर वॉर्डबॉय आणि शिपाई पदासाठी १० वी पास अशी शैक्षणिक अट आहे. कोरोनासाठी केलेली ही विशेष भरती असून कंत्राटी पद्धतीची आहे. शनिवार, १८ एप्रिलला पालिकेच्या दादर जी / उत्तर कार्यालयात सकाळी १० ते १ वाजेपर्यंत मुलाखती घेतल्या जाणार आहेत, अशी माहिती जी / उत्तर विभागाच्या आरोग्य अधिकाऱ्याने दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details