महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Rishikesh Deshmukh Not Relieved: ऋषिकेश देशमुख यांना न्यायालयाचा दिलासा नाही, 22 डिसेंबरला पुढील सुनावणी - खासगी सहायक कुंदन शिंदे

१०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात ( 100 Crore Recovery Case ) माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Ex HM Anil Deshmukh ) यांचे सुपुत्र ऋषिकेश देशमुख ( ED Notice Rishikesh Deshmukh ) यांना न्यायालयाने दिलासा दिलेला नाही. त्यांच्या अटकपूर्व जामिनावर पुढील सुनावणी आता २२ डिसेंबर रोजी होणार आहे. ईडीने चौकशीसाठी त्यांना बोलावले होते. मात्र त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

ईडी
ईडी

By

Published : Dec 18, 2021, 10:06 AM IST

मुंबई-100 कोटी कथित वसुलीप्रकरणी ( 100 Crore Recovery Case ) ईडीने ऋषिकेश देशमुख यांना नोटीस बजावली ( ED Notice Rishikesh Deshmukh ) होती. मात्र, ऋषिकेश देशमुख यांनी ईडी कार्यालयात न जाता मुंबईच्या विशेष न्यायालयामध्ये ( Mumbai Special Court ) अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर शुक्रवारी (दि.17) रोजी सुनावणी झाली. ऋषिकेश देशमुख यांच्याकडून ज्येष्ठ वकील विक्रम चौधरी ( Adv Vikram Caudhari ) यांनी बाजू मांडली. मात्र, तरीदेखील न्यायालयाने दिलासा दिला नसून ( Rishikesh Deshmukh Not Relieved ), पुढील सुनावणी 22 डिसेंबर रोजी होणार आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ( Ex CP Param Bir Singh ) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( NCP Chief Sharad Pawar ) यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Ex HM Anil Deshmukh ) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी एपीआय सचिन वाझेला ( API Sachin Waze ) प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे ( Private Secretary Sanjeev Palande ) आणि खासगी सहायक कुंदन शिंदे ( Private Assistant Kundan Shinde ) यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details