मुंबई-आज (शुक्रवार) दुपारी दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर जाऊन पाहता येणार होता. मात्र शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसला असून, जवळपास पाच तास संकेतस्थळ बंद झाल्याने विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता आलेला नाही. हजारो विद्यार्थी एकदाच संकेतस्थळावर पोहोचल्या कारणाने संकेतस्थळ हँग झाल्याचे स्पष्टीकरण शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून देण्यात आले आहे. मात्र याबाबतची पूर्वकल्पना संबंधित अधिकाऱ्यांना पाहिजे होती. त्यासंबंधीची पूर्वतयारी सर्व अधिकाऱ्यांनी करणे गरजेचे होते, असे मत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केले आहे. संकेतस्थळ हँग झाल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश शिक्षण मंत्र्यांनी दिले आहे. तसेच लवकरात लवकर या संबंधीची चौकशीही केली जाणार, असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
दहावी निकाल संकेतस्थळ हँग प्रकरण, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे शिक्षणमंत्र्यांचे आदेश
पूर्वतयारी सर्व अधिकाऱ्यांनी करणे गरजेचे होते, असे मत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केले आहे. संकेतस्थळ हँग झाल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश शिक्षण मंत्र्यांनी दिले आहे. तसेच लवकरात लवकर या संबंधीची चौकशीही केली जाणार, असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
दुपारी एक वाजता आपला निकाल पाहता येईल, या उद्देशाने हजारो विद्यार्थी संकेतस्थळावर पोहोचले. मात्र संकेतस्थळ हँग झाल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता आलेला नाही. संध्याकाळपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना आपला निकालच पाहता आला नसल्याने याचा मनस्ताप विद्यार्थ्यांना झाला. यावर्षी राज्याचा निकाल 99.95 टक्के लागला आहे. यावेळीही कोकण विभागाने अव्वल स्थान पटकावले असून कोकण विभागाचा 100% निकाल लागला आहे, तर तिथेच नागपूर विभागाचा सर्वात कमी म्हणजे 99.84 टक्के इतका निकाल लागला आहे.