लातूर - लोकसभेची ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. यावरच देशाचे भवितव्य अवलंबून आहे. मतदारांनी आपला हक्क बजावून लोकशाही बळकट करणे आवश्यक आहे, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांनी व्यक्त केले. मतदान केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
लोकशाहीच्या निवडणुकांवरच देशाचे भवितव्य अवलंबून - शिवराज पाटील-चाकूरकर - शिवराज पाटील-चाकूरकर
सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावून देशाची लोकशाही अधिक प्रबळ करावी, असे आवाहनही शिवराज पाटील-चाकूरकर यांनी केले.

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर
माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांची प्रतिक्रिया
लातूर येथील कम्युनिटी हॉल मतदान केंद्रावर त्यांनी साडे आठच्या दरम्यान मतदानाचा हक्क बजावला. लोकसभा निवडणूक ही काही गल्ली-गावाची निवडणूक नाही. यंदा नवमतदारांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावून देशाची लोकशाही अधिक प्रबळ करावी, असे आवाहनही शिवराज पाटील चाकूरकर यांनी केले.