कोल्हापूर - नवरात्रोत्सवाच्या आजच्या सहाव्या दिवशी करवीर निवासिनी आई अंबाबाईची 'काशीविश्वेश्वरांना दर्शन' रुपात पूजा बांधण्यात आली आहे. आज सहाव्या दिवशी अंबाबाईला दरवर्षीप्रमाणे तिरुपतीहून शालू आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असले तरी मोठ्या भक्तिभावाने यंदाही तिरुपती बालाजी देवस्थानने परंपरा जपत आई अंबाबाईला शालू पाठवला.
अंबाबाईची 'काशीविश्वेश्वरांना दर्शन' रुपात पूजा - कोल्हापूर अंबाबाई मंदिर बातमी
आज सहाव्या दिवशी अंबाबाईला दरवर्षीप्रमाणे तिरुपतीहून शालू आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे बंद असली तरी मोठ्या भक्तिभावाने यंदाही तिरुपती बालाजी देवस्थानने परंपरा जपत आई अंबाबाईला शालू पाठवला.
करवीर क्षेत्रामध्ये असलेले दशाश्वमेध तीर्थ आणि त्याचे महत्व शिव पार्वतीला सांगतात. त्यानंतर उमेसह करवीर क्षेत्री राहण्यासाठी आई अंबाबाईची स्तुती करून परवानगी मागतात. त्यावेळी आई अंबाबाई तिच्या उजव्या बाजूला श्री शिवाला वास करण्यास सांगत प्रत्येक जीवास अंती तारकमंत्राचा उपदेश करण्यास सांगते. तो ईशान सध्या अंबाबाई मंदिराच्या उजव्या बाजूचा काशीविश्वेश्वर आहे, तर त्यांच्यासमोर काशी कुंडही आहे. त्यामुळे करवीरला काशीचा दर्जा आहे, असे या पूजेचे महात्म्य आहे. श्रीपूजक मकरंद मुनीश्वर आणि माधव मुनीश्वर यांनी याबाबत माहिती दिली.