महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Vaccine Storage : लाईट गेल्यानंतर लस थंड ठेवण्यासाठी नेमकं काय केले जाते? पाहुयात खास रिपोर्ट - Kolhapur Weight Regulation

सध्या राज्यभरात लोडशेडिंगचा प्रश्न गंभीर आहे. शिवाय अनेक वेळा काही कारणास्तव वीज जात असते. अशा वेळी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच रुग्णालयातील कुल स्टोरेजमध्ये लहान मुलांच्या तसेच विविध प्रकारच्या लस ठेवल्या जातात. त्याठिकाणी काय उपाययोजना केल्या जातात याबाबत ईटीव्ही भारतने आढावा घेतला आहे.

Vaccine Storage
लाईट गेल्यानंतर लस थंड ठेवण्यासाठी नेमकं काय केले जाते

By

Published : May 17, 2022, 12:40 PM IST

कोल्हापूर - सध्या राज्यभरात लोडशेडिंगचा प्रश्न गंभीर आहे. शिवाय अनेक वेळा काही कारणास्तव वीज जात असते. अशा वेळी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच रुग्णालयातील कुल स्टोरेजमध्ये लहान मुलांच्या तसेच विविध प्रकारच्या लस ठेवल्या जातात. त्याठिकाणी काय उपाययोजना केल्या जातात याबाबत ईटीव्ही भारतने आढावा घेतला आहे. शिवाय बराच वेळ वीज नसेल तर नेमका काय पर्याय उपलब्ध असतो. पाहुयात या विशेष रिपोर्टमधून...

लसींची अशी घेतली जाते काळजी - रुग्णालय तसेच आरोग्य केंद्रांमध्ये लस साठविण्यासाठी विशेष फ्रिजर वापरले जातात, त्याला आय.एल.आर. म्हणतात. शिवाय एक डीप फ्रिजर सुद्धा वापरले जाते. मात्र सर्व प्रकारच्या लस आय.एल.आर. मध्येच साठविल्या जातात. एका खाली एक अशा पद्धतीने बास्केटमध्ये लस ठेवली जाते. त्यामध्ये नेहमी प्लस दोन ते प्लस चार डिग्री तापमान राहील. याची सुद्धा काळजी घेतली जाते. यासाठी एक थर्मामिटर सुद्धा ठेवला जातो आणि वेळोवेळी तापमान तपासले जाते. आय.एल.आर. तापमान जास्त कमी किंव्हा जास्त होऊ नये याची काळजी घेतली जाते. तापमान वाढू नये याठिकाणी आय.एल.आर वारंवार उघडले जाणार नाही याची सुद्धा काळजी घेतली जाते.

लाईट गेल्यानंतर लस थंड ठेवण्यासाठी नेमकं काय केले जाते?

लाईट गेली तर काय उपाययोजना -राज्यभरात भारनियमनचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मात्र आरोग्य केंद्र तसेच रुग्णालयामध्ये जिथे लससाठा असतो. तेथील लाईट गेल्यानंतर काय पर्याय उपलब्ध असतात याबाबत माहिती घेतली असता अनेक पर्याय उपलब्ध असतात असे समजले. लाईट गेलीच तर आय.एल.आर. मधील तापमान जवळपास 12 तासांहून अधिक काळ तसेच स्थिर राहून त्यामध्ये लस सुरक्षित राहू शकतात. या 12 तासांमध्ये आय.एल.आर. वारंवार उघडला जाणार नाही याची काळजी घेतली तरच 12 तासांपर्यंत तापमान स्थिर राहू शकते. त्यापेक्षाही अधिक काळ लाईट गेली तर आय.एल.आर. मधील लस बाहेर काढून कोल्ड बॉक्स मध्ये साठवून ठेवण्याचा पर्याय उपलब्ध आहे. त्या बॉक्समध्ये सुद्धा विशिष्ट प्रकारे आईस पॅक लावून घेऊन जवळपास 72 तास लस सुरक्षित राहू शकते अशी माहिती सेवा रुग्णालयातील आधि परिचारिका ज्योती बनसोडे यांनी दिली. शिवाय वॅक्सिन कॅरियर मध्ये सुद्धा आईस पॅक लावून 12 तासांपर्यंत लस सुरक्षित ठेवता येऊ शकते. हे सर्व असताना सुद्धा लाईट 72 तासांपेक्षा अधिक वेळ गेलीच तर ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांनी लस जिल्हा लस भांडारकडे वर्ग कराव्यात आशा सूचना सुद्धा सर्वांना देण्यात आल्या आहेत. सेवा रुग्णालय येथे तसेच विविध ठिकाणी सध्या जनरेटर ची सुद्धा व्यवस्था आहे. त्यामुळे शक्यतो लाईट गेल्याचा काहीही फटका बसत नाही मात्र त्यामध्ये सुद्धा जर बिघाड झाला तर संबंधित टेक्निशियन यांना तात्काळ फोनद्वारे संपर्क साधून बोलविण्यात येते अशी सुद्धा माहिती बनसोडे यांनी दिली.

हेही वाचा -Married woman rape Dharavi : धारावीत चाकूच्या धाकावर विवाहितेवर बलात्कार करणाऱ्या 2 आरोपींना अटक

ABOUT THE AUTHOR

...view details