कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील आशिष नलवडे यांचा इंग्लंड येथील टीसाईड युनिव्हर्सिटीमध्ये ( Teesside University England ) एमएस पदवीदान समारंभात ( Teesside University Graduation Ceremony ) पदवी घेतानाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. पदवीदान समारंभात पदवी घेताना 'शिवाई' या त्यांच्या मुलीने स्तब्ध असलेल्या हॉलमध्ये वडिलांना मोठ्या आवाजात अभिनंदन केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल ( Teesside University graduation ceremony video goes viral ) होत आहे. चुमुकल्याने आपल्या वडिलाबद्दल व्यक्त केलेले हे प्रेम सगळीकडे चर्चेचा विषय ठरला आहे.
2010 पासून नेव्हीमध्ये - आशिष नलवडे यांचे 2009 साली मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण झाले. कोल्हापूरातील कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमधून ( D. Y. Patil Engineering College ) त्याचे पदवीचे शिक्षण झाले. त्यानंतर त्यांनी 2010 ते 2018 या काळात 8 वर्षे नेव्हीमध्ये नोकरी केली. आता 2018 पासून ते इंग्लंडमध्येच एमएस करत होते. नुकताच त्यांचे एमएस पूर्ण झाल्यानंतर पदवीदान समारंभ आयोजित केला होता. येथील युनिव्हर्सिटीच्या एका भव्य हॉल मध्ये हा समारंभ सुरू होता. अतिशय शांत असलेल्या या हॉलमध्ये आशिष नलवडे यांच्या चिमुकल्या 'शिवाई'ने "Congratulations Daddy", "I love you daddy" असे मोठ्या आवाजात अभिनंदन केले.