कोल्हापूर -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 6 महिन्यांपासून खेळाची मैदाने बंद आहेत. मात्र, आता तरी मैदाने खुली करा या मागणीसाठी खेळाडूच रस्त्यावर उतरले असून त्यांनी कोल्हापुरात अनोखे आंदोलन केले. कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारातच क्रिकेट, हॉकी, फुटबॉल आणि स्केटिंग सह इतर खेळाडूंनी आपापले खेळ खेळत अनोखे आणि लक्षवेधी आंदोलन केले.
कोल्हापुरात मैदाने सुरू करण्याची मागणी, खेळाडुंनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खेळ खेळत केले अनोखे आंदोलन
विशेष म्हणजे या लक्षवेधी आंदोलनात राष्ट्रीय स्तरावरील आणि खेलो इंडियातील खेळाडू देखील मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. यावेळी मैदानात खुली करा या मागणीच्या घोषणा सुद्धा देण्यात आल्या आहेत. यावेळी शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा घोषणा देत परिसर दणाणून सोडत शासनाने मैदाने खुली केली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.
केंद्र सरकारने 15 ऑक्टोबरपासून इतर व्यवहारांबरोबरच मैदान सुद्धा खुली करण्याचे आदेश दिले आहेत. त्या आदेशाचे पालन राज्य सरकारने तात्काळ करावे आणि 15 ऑक्टोबरपासून राज्यातील मैदानच खुली करावी यासाठी हे अनोखं आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे या लक्षवेधी आंदोलनात राष्ट्रीय स्तरावरील आणि खेलो इंडियातील खेळाडू देखील मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. यावेळी मैदानात खुली करा या मागणीच्या घोषणा सुद्धा देण्यात आल्या आहेत. यावेळी शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा घोषणा देत परिसर दणाणून सोडत शासनाने मैदाने खुली केली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.