कोल्हापूर - कोल्हापुरात आज आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. शाहूवाडी तालुक्यातील शित्तुर उर्फ मलकापूरमधील 30 वर्षीय गरोदर महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर इचलकरंजी मधील आयजीएम रुग्णालयात दाखल झालेल्या एका 20 वर्षीय एक तरुणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
कोल्हापूरात आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह; गरोदर महिलेला कोरोनाची लागण
कोल्हापुरात आज दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. शाहूवाडी तालुक्यातील शित्तुर उर्फ मलकापूरमधील 30 वर्षीय गरोदर महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर इचलकरंजी मधील आयजीएम रुग्णालयात दाखल झालेल्या एका 20 वर्षीय एक तरुणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. आजच्या दोन रुग्णांना पकडून सध्या 16 जणांवर उपचार सुरू आहेत.
शित्तुरमधील महिलेने आपल्या पती आणि ड्रायव्हरसोबत मुंबईवरून प्रवास केला होता. त्यानंतर त्यांना 11 मे रोजी सीपीआरमध्ये केले होते दाखल केले होते. पती आणि ड्रायव्हर यांचा रिपोर्ट अद्याप प्राप्त झालेला नाही. पण दोघांना येथील शिवाजी विद्यापीठात संस्थात्मक अलगीकरण ठेवण्यात आले आहे.
दुसरा पॉझिटिव्ह रुग्ण इचलकरंजी येथील आयजीएममध्ये दाखल झाला. त्याच्यावरसुद्धा रुग्णालयात उपचार सुरू झाले आहेत. कोल्हापुरातील रुग्णांची संख्या 27 वर पोहोचली असून सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत कोल्हापूरात वाढ झाली आहे. आत्तापर्यंत 10 जणांना डिस्चार्ज दिला आहे. तर एकाचा मृत्यू झाला असून आजच्या दोन रुग्णांना पकडून सध्या 16 जणांवर उपचार सुरू आहेत.