कोल्हापूर - आजपासून राज्यभरात 12 ते 14 वयोगटातील ( Children Vaccination In Maharashtra ) मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. कॉर्बोव्हॅक्स नावाची लस या वयोगटातील मुलांना देण्यात येणार आहे. आज कोल्हापूरात प्रातिनिधिक स्वरूपात ( Symbolic Vaccination Done In Kolhapur ) काही ठिकाणी मोजक्याच मुलांचे लसीकरण करण्यात आले. पन्हाळा तालुक्यातल्या बोरपाडळे गावात सुद्धा 20 मुलांचे आजच्या पहिल्याच दिवशी लसीकरण करण्यात आले. उद्या गुरुवारपासून जिल्ह्यातल्या अनेक लसीकरण केंद्रावर लसीकरणाची सुरुवात होणार आहे.
जिल्ह्यात 12 ते 14 वयोगटातील 'इतकी' मुलं लाभार्थी -
कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 1 लाख 91 हजार इतकी मुलं 12 ते 14 वयोगटातील आहेत. त्यांच्या लसीकरणाला सुरुवात झाली असून पुढीलप्रमाणे प्रत्येक तालुक्यातील मुल लाभार्थी आहेत.
- आजरा : 5907
- भुदरगड : 7358
- चंदगड : 9175
- गडहिंग्लज : 11081
- गगनबावडा : 1750
- हातकणंगले : 39989
- कागल : 13533
- करवीर : 23902
- पन्हाळा : 12698
- राधानगरी : 9772
- शाहूवाडी : 9092
- शिरोळ : 19262
- कोल्हापूर शहर : 27592
असे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात एकूण 1 लाख 63 हजार 519 विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहेत, तर कोल्हापूर शहरातील 27 हजार 592 असे जिल्ह्यात 1 लाख 91 हजार 111 इतके उदिष्ट ठेवण्यात आले आहे. दरम्यान, बोरपाडळे येथील आरोग्य केंद्रात 20 जणांचे प्रतिनिधिक स्वरूपात लसीकरण करण्यात आले. यावेळी डॉ. अहिल्या कणसे, डॉ. अदिती देसाई, गटप्रवर्तक, आशा आदी उपस्थित होते.
हेही वाचा -Maharashtra Holi Guidelines : होळी, धुळवडीसाठी राज्य सरकारची नवी नियमावली जाहीर; जाणून घ्या नियम व अटी