कोल्हापूर - गेल्या अडीच वर्षांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी ( Swabhimani Shetkari Sanghatana Leader Raju Shetti ) यांना महाविकास आघाडी सरकारकडून निराशाच हाताला लागली आहे. त्यामुळेच ते आता महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याची शक्यता आहे. येत्या 5 एप्रिल रोजी शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कार्यकारणी बैठक बोलावली आहे. या बैठकीत कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे शेट्टी यांनी म्हटलं आहे.
...तेव्हा सरकारविरोधात आक्रमक भूमिका
राजू शेट्टी म्हणाले की, मागील अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकाराने शेतकऱ्यांविषयी घेतलेल्या अनेक निर्णयांबाबत 5 एप्रिलला बैठकीत चर्चा करणार आहोत. शिवाय यापूर्वी जेव्हा जेव्हा सरकार शेतकरी विरोधी निर्णय घेत होते. तेव्हा तेव्हा त्याची सरकारला जाणीव करुन दिली आहे, असेही शेट्टी यांनी सांगितले आहे.