कोल्हापूर - राज्यात पुन्हा एकदा घरगुती वीज बिल वसुली सुरू करण्यात आली आहे. ऊर्जामंत्री यांनी थकबाकीदारांचे वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश दिले आहेत. यावर आता महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनसह विविध पक्ष, संघटना आता आक्रमक झाल्या आहेत. राज्य सरकारच्या या सक्तीविरोधात 19 मार्च रोजी राज्यस्तरीय महामार्ग रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला. शिवाय ज्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग नाही त्याठिकाणी राज्यमार्ग किंवा जिल्हामार्ग रोखण्यात येणार असल्याची घोषणासुद्धा त्यांनी यावेळी केली आहे. कोल्हापुरात विविध संघटनांची बैठक पार पड.ली या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हेही वाचा -धक्कादायक! ऐन कोरोनाच्या काळात कळंबमध्ये बनावट औषधांची विक्री
अधिवेशनामध्ये वीज कनेक्शन तोडायला स्थगिती मात्र नंतर पुन्हा वसुली :
नुकतेच अधिवेशन पार पडले आहे. यामध्ये विरोधकांनी लाईट बिलाचा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकारला धारेवर धरले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीज कनेक्शन तोडायला स्थगिती देत असल्याची माहिती दिली. मात्र, अधिवेशन संपताच ऊर्जा मंत्र्यांनी वीज बिल वसूल करा वेळ पडल्यास कनेक्शन तोडा असे आदेश दिले. राज्यातील विधानसभा सभागृहाचा हा अवमान आहे. शिवाय राज्यातील गोरगरीब वीज ग्राहकांचीसुद्धा ही चेष्टा सरकारने लावली आहे त्याचा जाहीर निषेध करत असल्याचं यावेळी बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
वीज बिल माफ झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही -
आम्ही केवळ तीन महिन्यांचे वीज बिल माफ करा अशी मागणी करत आहोत. गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने वीज बिल या मुद्द्यावरून आंदोलन होत आहेत. मात्र, तरीही सरकारला याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. एकीकडे ग्राहकांना दिलासा देऊ असं सांगितलं जातं, लाईट बिल मध्ये दिलासा मिळेल या आशेवर ग्राहकांनी सुद्धा वीज बिल भरायचे थांबवले. आता मात्र कोणत्याही परिस्थितीत वापरलेल्या विजेचे बिल भरावेच लागेल असे म्हटले जाते. म्हणूनच कोणत्याही परिस्थितीत वीज बिल माफ होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचे यावेळी शेट्टी यांनी म्हटले आहे. त्यामुळे येत्या 19 मार्च रोजी राज्यस्तरावर महामार्ग रोको आंदोलन करून सरकारला याबाबत निर्णय घ्यायला भाग पाडू असा इशाराही त्यांनी दिला आहे.
हेही वाचा -...तर विश्वासघातकी महाविकास आघाडी विरोधात रस्त्यावर उतरणार - राजू शेट्टी